दांबुला INDW vs NEPW T20I : महिला आशिया चषक 2024 मध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. उभय संघांमध्ये साखळी फेरीतील शेवटच्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकांत 3 बाद 178 धावा काढल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 20 षटकांत 9 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारु शकला. परिणामी हा सामना भारतीय संघानं 82 धावांनी जिंकत आपला विजयरथ कायम ठेवलाय.
𝙄𝙣𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙎𝙚𝙢𝙞𝙨!#TeamIndia continue their winning run in #WomensAsiaCup2024 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#ACC | #INDvNEP pic.twitter.com/8Eg77qAJOt
भारतीय गोलंदाजीसमोर नेपाळचे फलंदाज फ्लॉप : भारतानं दिलेल्या 179 धावांचं पाठलाग करण्यासाठी उतरलेला नेपाळ संघ भारतीय गोलंदाजांसमोर 20 निर्धारित षटकांत 9 गडी गमावून केवळ 96 धावाच करु शकला. भारताचा हा सलग तिसरा विजय असून त्यांनी उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. भारताकडून अरुधंती रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2, तर दीप्ती शर्मानं सर्वाधिक 3 बळी घेतले. नेपाळकडून सीता राणा मगरनं सर्वाधिक 18 धावांची खेळी केली.
भारतानं उभारली मोठी धावसंख्या : तत्पूर्वी, भारतीय कर्णधार मंधानानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शेफाली वर्माच्या 48 चेंडूत 81 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतानं स्पर्धेतील शेवटच्या गट सामन्यात नेपाळविरुद्ध 3 गडी गमावून 178 धावा केल्या. शेफालीनं आपल्या डावात 12 चौकार आणि एक षटकार मारण्याबरोबरच डी हेमलतासोबत पहिल्या विकेटसाठी 84 चेंडूत 122 धावांची भागीदारी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. हेमलतानं 42 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 47 धावांचं योगदान दिलं.
दोन्ही संघात दोन बदल : या सामन्यात भारतीय संघाची नियमीत कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आल्यामुळं आज स्मृती मंधानानं संघाचं नेतृत्त्व केलं. यासोबतच पूजा वस्त्राकरलाही विश्रांती देण्यात आली. त्यांच्याऐवजी संघात एस सजना आणि अरुंधति रेड्डी यांना संधी देण्यात आली होती. तसंच नेपाळनंही आपल्या 2 बदल केले होते.
हेही वाचा :