ETV Bharat / sports

अमेरिकेतही नितीश कुमारांचाच दबदबा; भारताच्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाचा केला पराभव - ICC T20 Worls Cup - ICC T20 WORLS CUP

Nitish Kumar : अमेरिकन क्रिकेटपटू नितीश कुमार आयसीसी टी-20 विश्वचषकात आपली छाप पाडतोय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

नितीश कुमार
नितीश कुमार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 8:52 PM IST

Updated : Jun 7, 2024, 10:03 PM IST

हैदराबाद Nitish Kumar : नितीश कुमार हे नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. राजकारण असो की खेळ याच नावाची सध्या चर्चा आहे. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्यांदा स्थापन होणाऱ्या एनडीए सरकारमध्ये 'किंग मेकर' म्हणून उदयास आले आहेत. नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (JDU) नं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 12 जागा जिंकल्या आहेत आणि मोदी 3.0 मध्ये हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

क्रिकेटपटू नितीश कुमार : तोच दुसरीकडे अमेरिकेचा क्रिकेटपटू नितीश कुमारनं क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिलीय. त्याला कारण म्हणजे सध्या अमोरिकेत सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नितीशनं आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावा करायच्या होत्या, तेव्हा नितीशनं हरिस रौफचा चेंडूवर चौकार मारला. या चौकारामुळंच हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचू शकला. नितीशनं 100 च्या स्ट्राइक-रेटनं नाबाद 14 धावा केल्या, ज्यात एक चौकार समाविष्ट आहे. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरची झाली, ज्यात अमेरिकन संघानं पाकिस्तानचा पराभव केला. अमेरिकेचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला.

दोनदा बदलला संघ : बिहारचे नितीश कुमार यांच्यावर ते नेहमी युती बदलतात अशी टीका होत असेत. हा क्रिकेटपटू नितीश कुमारही संघ बदलण्यात माहीर आहे. नितीशनं अंडर-15 स्तरावर अमेरिका आणि नंतर कॅनडासाठी क्रिकेट खेळलं. यानंतर तो कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यातही यशस्वी ठरला. फेब्रुवारी 2010 मध्ये नितीशनं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी नितीशचं वय 15 वर्षे 273 दिवस होतं. त्यावेळी नितीश हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू होता.

सर्वात तरुणपणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे खेळाडू :

  • 14 वर्षे 233 दिवस- हसन रझा, पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, क्वेटा 1996
  • 15 वर्षे 116 दिवस- मोहम्मद शरीफ, बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे 2001
  • 15 वर्षे 212 दिवस- गुलशन झा नेपाळ विरुद्ध यूएसए, अल अमिराती 2021
  • 15 वर्षे 258 दिवस- गुरदीप सिंग, केनिया विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह 2013
  • 15 वर्षे 273 दिवस- नितीश कुमार, कॅनडा विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह 2010

नितीशनं 2011 च्या विश्वचषकात रचला होता इतिहास : भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांनी 2011 मध्ये संयुक्तपणे आयोजित केलेल्या क्रिकेट विश्वचषकात नितीश कॅनडाच्या संघात होता. त्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात उतरताच नितीशनं इतिहास रचला. नितीश विश्वचषक खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्यावेळी नितीशचं वय 16 वर्षे 283 दिवस होतं. नितीशनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 27 ऑक्टोबर 2019 रोजी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध कॅनडासाठी खेळला. नितीशनं कॅनडासाठी 16 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्यानं काही सामन्यांमध्ये कॅनडाच्या संघाचं नेतृत्वही केलंय. यानंतर नितीश कुमार जेव्हा मायनर क्रिकेट लीग खेळण्यासाठी निवडला गेला तेव्हा तो यूएसएला गेला. तिथं नितीशनं देशांतर्गत स्तरावर चांगली कामगिरी करुन अमेरिका संघात स्थान मिळवलं. नितीशनं एप्रिल 2024 मध्ये त्याच्या जुन्या संघ कॅनडाविरुद्धच्या सामन्यातून अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. नितीशनं आतापर्यंत अमेरिकेसाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

अष्टपैलू आहे नितीश कुमार : उजव्या हाताचा फलंदाज असण्यासोबतच नितीश कुमार एक उपयुक्त ऑफब्रेक गोलंदाज देखील आहे. 30 वर्षीय नितीशनं आतापर्यंत 16 एकदिवसीय आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यानं एकदिवसीय सामन्यात 15.50 च्या सरासरीनं 217 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नितीशनं 31.29 च्या सरासरीनं 532 धावा केल्या, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. नितीशनं एकदिवसीय सामन्यात 2 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.

नितीश कुमार याची क्रिकेट कारकिर्द :

  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय : 16 सामने, 217 धावा आणि 2 विकेट
  • टी-20 आंतरराष्ट्रीय : 24 सामने, 532 धावा आणि 7 विकेट्स
  • प्रथम श्रेणी : 15 सामने, 644 धावा आणि 11 विकेट
  • लिस्ट ए : 79 सामने, 2114 धावा आणि 29 विकेट
  • टी-20 : 40 सामने, 748 धावा आणि 12 विकेट

हेही वाचा :

  1. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारणारा सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण? - Saurabh Netravalkar Biography
  2. सुपर ओव्हरच्या थरारात अमेरिकेकडून पाकिस्तानचा पराभव; मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर ठरला विजयाचा शिल्पकार - T20 World Cup 2024

Last Updated : Jun 7, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.