अल अमेरत IND A vs PAK Shaheens Liev Streaming : भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2024 चा चौथा सामना आज 19 ऑक्टोबर (शनिवार) रोजी अल अमेरत क्रिकेट मैदान, मंत्रालय टर्फ इथं खेळवला जाईल. ACC पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत आशिया खंडातील आठ संघ सहभागी होणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) द्वारे आयोजित, ही स्पर्धा युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते.
𝘼 𝙧𝙞𝙫𝙖𝙡𝙧𝙮 𝙡𝙞𝙠𝙚 𝙣𝙤 𝙤𝙩𝙝𝙚𝙧!🤜🤛
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 19, 2024
Brace yourselves for the battle between India ‘A’ and Pakistan ‘A’ in match 4️⃣ of the #MensT20EmergingTeamsAsiaCup!⚡️#ACC pic.twitter.com/WsZTMp8tse
तिलक वर्मा करणार भारताचं नेतृत्त्व : रमणदीप सिंग, नेहल वढेरा, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, अनुज रावत, साई किशोर आणि राहुल चहर हे स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारत अ संघाचं नेतृत्व करताना तिलक वर्मा दिसणार आहेत. तर पाकिस्तान अ संघाचं नेतृत्व त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद हॅरिस करणार आहे. या संघात वेगवान गोलंदाज जमान खान आणि शाहनवाज डहानी यांचाही समावेश आहे. 2023 मधील स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, भारत अ नं गट टप्प्यात पाकिस्तान अ संघाचा आठ गडी राखून पराभव केला होता, परंतु अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 128 धावांनी पराभव केला होता.
स्पर्धेत किती संघ सहभागी : यावेळी इमर्जिंग आशिया चषक T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांव्यतिरिक्त हाँगकाँग, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि यूएईचे संघही सहभागी होत आहेत. यावेळी भारतीय अ संघाला स्पर्धेत अ गटात स्थान मिळालं असून त्यात पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि ओमानचे संघही सहभागी आहेत.
भारत A विरुद्ध पाकिस्तान A इमर्जिंग टीम्स आशिया कप सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ इमर्जिंग टीम्स आशिया चषकाचा चौथा सामना 19 ऑक्टोबर (शनिवार) रोजी अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मंत्रालय टर्फ 1, अल अमेरत इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06.30 वाजता होईल.
भारत A विरुद्ध पाकिस्तान A आशिया कपचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 चे प्रसारण हक्क आहेत. जे आपल्या टीव्ही चॅनल स्टार स्पोर्ट्स 1 वर भारत A विरुद्ध पाकिस्तान A चौथ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल. जिथे चाहत्यांना सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.
भारत A विरुद्ध पाकिस्तान A इमर्जिंग आशिया कप 2024 चं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पहावं?
भारत A विरुद्ध पाकिस्तान A इमर्जिंग आशिया कप 2024 चं लाईव्ह स्ट्रीमिंग FanCode च्या ॲप आणि ब्राउझरवर पाहू शकतात. याशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवर फॅनकोड ॲपवरही हा सामना पाहू शकता.
इमर्जिंग आशिया कप T20 साठी भारत आणि पाकिस्तानचे संघ :
भारत - तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, आकिब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर.
पाकिस्तान - मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्बास आफ्रिदी, कासिम अक्रम, अहमद दानियाल, शाहनवाज डहानी, मोहम्मद इम्रान, हसिबुल्ला खान, यासिर खान, जमान खान, अराफत मिन्हास, सुफियान मोकीम, मेहरान मुमताज, अब्दुल समद, ओमिर युसूफ.
हेही वाचा :