नवी दिल्ली WTC Point Table : न्यूझीलंड क्रिकेट संघाला पुढील 2 महिन्यांत आशियाई उपखंडात एकूण 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा इथं होणाऱ्या एक सामन्याच्या कसोटी मालिकेनं झाली. खराब हवामानाचा परिणाम या सामन्यावर दिसून आला, त्यामुळं हा सामनाच रद्द झाला आहे, हा सामना रद्द झाल्यानं त्याचा परिणाम सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) तिसऱ्या आवृत्तीच्या गुणतालिकेत दिसून येईल की नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.
🚨HISTORY CREATED IN NOIDA...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 13, 2024
- Afghanistan Vs New Zealand becomes the first ever Test in 91 years to be abandoned completely without a single ball being bowled due to rain. 🤯 pic.twitter.com/RVnVRjqBzH
हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नाही : जेव्हा ICC नं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु केली होती. तेव्हा 9 देशांना क्रमवारीच्या आधारावर खेळण्याची परवानगी होती, जी कटऑफ तारखेनुसार ठरवली जाते. अफगाणिस्तानला कसोटी सामने खेळण्याचा दर्जा मिळाला असला, तरी सध्या हा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत 12व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचा भाग नाही. अफगाणिस्तान व्यतिरिक्त, आयर्लंड आणि झिम्बाब्वे देखील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाहीत. सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत आयर्लंड 10व्या तर झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान 11व्या आणि 12व्या स्थानावर आहेत.
न्यूझीलंड संघासाठी अंतिम फेरीचा मार्ग किती कठीण : 2021 मध्ये झालेल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं. आता तिसऱ्या आवृत्तीत अंतिम फेरी गाठण्याच्या त्यांची शक्यता पाहिली तर ते सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंड संघाची 50 गुणांची टक्केवारी आहे, ज्यात त्यांनी 6 कसोटी सामने खेळले आहेत आणि 3 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. सध्या, त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या आवृत्तीत आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत, ज्यात त्यांचा सामना श्रीलंका आणि भारत व्यतिरिक्त इंग्लंडच्या संघाशी होणार आहे. न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सामन्यांपैकी किमान 6 कसोटी सामने जिंकावे लागतील.
हेही वाचा :
- वनडे विश्वचषकाच्या आयोजनानं भारताला मोठा फायदा, कमावले 116370000000 रुपये - World Cup Impact on Indian Economy
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना भारतात कुठं बघता येईल लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 1st t20i live in india
- हे काय... ऑस्ट्रेलियन कर्णधाराला स्कॉटलंडविरुद्ध मालिका विजयानंतर मिळाला 'कटोरा' - Hilarious T20 Trophy