Pakistan Cricket Spectacle : पाकिस्तान क्रिकेटमध्ये जेंव्हा काही चांगलं घडतं तर त्याच्या काही काळानंतर वाईटही होतं. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, शान मसूदच्या संघानं जबरदस्त पुनरागमन केलं आणि पुढील दोन कसोटी सामने जिंकले. परिणामी पाकिस्तानला बऱ्याच कालावधीनंतर घरच्या मैदानावर विजयाची चव चाखायला मिळाली. मात्र, याच्याच काही दिवसांनी मोठा वाद चव्हाट्यावर आला. संघाचे वनडे आणि T20 प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्याकडे वनडे T20 ची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
The Pakistan Cricket Board today announced Jason Gillespie will coach the Pakistan men’s cricket team on next month’s white-ball tour of Australia after Gary Kirsten submitted his resignation, which was accepted.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 28, 2024
संघात सतत बदल : पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा वनडे आणि T20 चा नवा कर्णधार झाला आहे. शान मसूदकडं आधीच कसोटी संघाची जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान क्रिकेट संघानं चार कर्णधार, चार बोर्ड अध्यक्ष, आठ वेगवेगळे प्रशिक्षक आणि 26 वेगवेगळे निवडक पाहिले आहेत. एहसान मणी 2021 मध्ये बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यापासून संघात सतत बदल होत आहेत. पीसीबीचा राजकीय प्रभावही या बदलांमध्ये मोठी भूमिका बजावत आहे.
गॅरी कर्स्टन यांनी राजीनामा का दिला? : गॅरी कर्स्टन यांना दोन वर्षांच्या करारावर पाकिस्तान संघाचे व्हाईट बॉल प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला. रिपोर्ट्सनुसार कर्स्टन आणि पीसीबीमध्ये संघ निवडीबाबत मतभेद होते. नव्या निवड समितीनं प्रशिक्षक आणि कर्णधाराला हटवून संघ निवडीचे अधिकारही आपल्या ताब्यात घेतले आहेत. नव्या निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आकिब जावेदला बरेच अधिकार देण्यात आले आहेत. ते निवड समितीचे अध्यक्ष नाहीत, पण त्यांच्याकडे बहुतांश अधिकार आहेत. त्यांच्यासोबत माजी पंच अलीम दार, माजी कर्णधार अझहर अली, माजी क्रिकेटपटू असद शफीक, विश्लेषक हसन चीमा हे देखील निवडकर्ते आहेत.
🗣️ @iMRizwanPak shares his thoughts on being appointed Pakistan's white-ball captain, expressing his commitment to fulfilling this responsibility and taking the team forward 🇵🇰 pic.twitter.com/SzroybEGKv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 28, 2024
प्रशिक्षक आणि अध्यक्षही बदलले : 2021 पासून, कर्स्टन हे आठवे व्यक्ती होते ज्यांची पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मिसबाह उल-हक, मोहम्मद हाफीज आणि सकलेन मुश्ताक या देशांतर्गत खेळाडूंनाही ही जबाबदारी देण्यात आली होती. कर्स्टन आणि मिकी आर्थर सारख्या मोठ्या नावाच्या परदेशी खेळाडूंनाही संघात सामील करण्यात आलं. परंतु कोणीही फार काळ टिकू शकलं नाही. या काळात पीसीबीच्या अध्यक्षपदावर नवीन लोक विराजमान होत राहिले. रमीझ राजा, नजम सेठी, झका अश्रफ आणि मोहसिन नक्वी यांनी 2021 पासून पदभार स्वीकारला. अध्यक्ष बदलताच कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीही बदलण्यात आली.
शाहिद आफ्रिदी आणि इंझमामही झाले निवडकर्ते : या कालावधीत मुख्य निवडकर्ते आणि 26 समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाहिद आफ्रिदी आणि इंझमाम उल-हकपासून वहाब रियाझपर्यंत यापैकी काही नावं आश्चर्यकारक आहेत. त्यांच्यापैकी अनेकांवर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप आहेत. कर्णधारपदात खूप झपाट्यानं बदल झाले आहेत. बाबर आझम हा काही काळापूर्वी सर्व फॉरमॅटचा कर्णधार होता, पण नंतर त्याची जागा वनडे आणि T20 मध्ये शाहीन शाह आफ्रिदी आणि नंतर कसोटी सामन्यांमध्ये शान मसूदनं घेतली. एका मालिकेनंतर शाहीनला काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा बाबरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. आता त्यानं राजीनामा दिला आणि मोहम्मद रिझवानकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली.
PCB Chairman Mohsin Naqvi's opening statement at today’s press conference as Mohammad Rizwan is announced Pakistan's white-ball captain and Salman Ali Agha to serve as vice-captain.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
Full press conference ➡️ https://t.co/OlvdOqtX0R pic.twitter.com/tf8OvAXZgy
संघाचा समतोल ढासळत चालला : बाबर आझमला कर्णधारपदावरुन काढून टाकणं, नंतर त्याला परत आणणं आणि पुन्हा काढून टाकणं, या सगळ्याचा परिणाम पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर होत आहे. नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदीसारख्या युवा वेगवान गोलंदाजांचा योग्य वापर केला जात नाही. सततच्या बदलांमुळं संघाचा समतोल बिघडत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सातत्यानं होत असलेल्या बदलांचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही होत आहे. भविष्यात पाकिस्तान क्रिकेट कोणत्या दिशेनं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2021 पासून PCB मध्ये झालेले मोठे बदल :
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष :
- रमिझ राजा : 2021-22
- नजम सेठी : 2022-23
- झका अश्रफ : 2023-24
- मोहसीन नक्वी : 2024 पासून
संघाचे प्रशिक्षक :
- मिसबाह उल हक : 2019-21
- सिकंदर बस्ती : 2021-22
- सईद अजमल : 2022
- साकिब मसूद : 2022-23
- अब्दुल रहमान (अंतरिम) : 2023
- ग्रँट ब्रॅडबर्न : 2023
- मोहम्मद हाफीज : 2023-24
- अझहर महमूद (अंतरिम) : 2024
- गॅरी कर्स्टन (वनडे आणि T20) : 2024
- जेसन गिलेस्पी (कसोटी) : 2024 पासून
- जेसन गिलेस्पी (अंतरिम वनडे आणि T20) : 2024 पासून
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
संघाचे मुख्य निवडकर्ता :
- मोहम्मद वसीम : 2020-22
- शाहिद आफ्रिदी : 2022-23
- हारुन रशीद : 2023-23
- इंझमाम-उल-हक : 2023-23
- वहाब रियाझ : 2023-24
- आता मुख्य निवडकर्ता नाही : 2024 पासून
संघाचे कर्णधार :
- बाबर आझम : 2020-23
- शाहीन शाह आफ्रिदी (वनडे आणि T20) : 2024
- शान मसूद (कसोटी) : 2024
- बाबर आझम (पांढरा चेंडू) : 2024
- मोहम्मद रिझवान (पांढरा चेंडू) : 2024 पासून
हेही वाचा :