नवी दिल्ली Black Water : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. कोहलीनं आतापर्यंत वनडे, T20 आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. त्यानं वनडेमध्ये 50 शतकांसह 13906 धावा, T20 मध्ये एका शतकासह 4188 धावा आणि कसोटीत 30 शतकांसह 9145 धावा केल्या आहेत. यासह त्यानं एकूण 81 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली आहेत. त्याच्या फिटनेसमुळं तो क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करु शकला आहे, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.
कोहली पितो 'ब्लॅक वॉटर' : कोहली क्रिकेटप्रमाणेच फिटनेसलाही महत्त्व देतो. इतर क्रिकेटपटूंशी तुलना केल्यास कोहली हा फिटनेस फ्रीक आहे. याबाबत कोहलीनं स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. तो व्यायामासह आहाराकडेही अधिक लक्ष देतो. त्यामुळं कोहली खात असलेल्या भातापासून ते पिणाऱ्या पाण्यापर्यंत सर्व काही महाग आहे. विशेषतः तो जे पाणी पितो ते विशेष आहे. कारण कोहली मिनरल वॉटरऐवजी 'ब्लॅक वॉटर' पितो.
काय आहेत या पाण्याचे फायदे : या पाण्याचा रंग काळा असून त्याची pH पातळी सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते. ही पीएच पातळी पाणी किती शुद्ध आहे हे सांगते. याचा अर्थ हा पाण्याच्या गुणवत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे पाण्याची पीएच पातळी 6 ते 7 असते. या काळ्या पाण्याची पीएच पातळी 8.5 आहे. म्हणजे सर्वोच्च शुद्धतेचं पाणी आहे. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या या काळ्या पाण्यात 70 हून अधिक खनिजं असतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या काळ्या पाण्यातील रेणू लहान असतात. हे आपल्या शरीरातील पेशी सहजपणे शोषून घेतात. शिवाय हे काळ्या पाण्याचे रेणू आपल्या शरीराला दिलेले पोषक तत्व टिकवून ठेवण्यासाठी खूप लवकर काम करतात. या काळ्या पाण्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
काळ्या पाण्याची किंमत किती : साधारणत: मिनरल वॉटरची किंमत 20 ते 40 रुपये असते, मात्र या काळ्या पाण्याची किंमत प्रति लिटर 600 ते 3000 रुपये असेल. विशेषतः हे पाणी फ्रान्समधून आयात केलं जातं. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोहलीनं हे काळं पाणी पिण्यास सुरुवात केल्याचं वृत्त आहे. फक्त कोहलीच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, मलायका अरोरा, साऊथ स्टार श्रुती हसन यांसारखे प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रीही फिट राहण्यासाठी या काळ्या पाण्याचा वापर करतात.
हेही वाचा :