जमैका West Indies Cricketer Suspended : नाणेफेकीसाठी योग्य वेळी कर्णधार न आल्यानं संपूर्ण सामना रद्द झाल्याची एक विचित्र घटना क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाली. वास्तविक, हे वेस्ट इंडिजमध्ये पाहायला मिळालं आहे, ज्यामध्ये जमैका स्कॉर्पियन्स संघाचा कर्णधार, जो त्यांच्या घरच्या एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जॉन कॅम्पबेल नाणेफेकीला वेळेवर पोहोचला नाही आणि त्यामुळं रेफ्रींनी सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट वेस्ट इंडिजनं जॉन कॅम्पबेलची ही कृती अनुशासनहीन मानून त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घातली आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर कॅम्पबेलनं नंतर माफी मागितली.
John Campbell Suspended for Four Matches Following CG United Super50 Final Incident.
— Windies Cricket (@windiescricket) December 6, 2024
Read More🔽 https://t.co/QxHvkiJmcU
माझं कृत्य सामना अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ : टॉससाठी वेळेवर न पोहोचल्याबद्दल जॉन कॅम्पबेलनं नंतर सर्वांची माफी मागितली आणि सांगितलं की अंतिम सामन्यात कोणत्याही व्यत्ययाबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. सामना अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध म्हणून माझ्या कृतीकडे पाहिलं जाऊ शकतं हे मला मान्य आहे. तथापि, माझ्या कृतीमुळं त्यांचे अधिकार कमी करणे किंवा या खेळाची बदनामी करणे असा माझा अजिबात हेतू नव्हता. खेळाचे हक्क आणि प्रतिष्ठेबाबत निर्णयांचं महत्त्व मला पूर्णपणे समजलं आहे आणि पुढंही समजत राहीन. या सामन्यात पावसामुळं पंचांनी 20-20 षटकांचा निर्णय घेतला होता, त्यामुळं दोन्ही संघांचे कर्णधार आनंदी नव्हते आणि दोघंही आले नाहीत, त्यानंतर कॅम्पबेलनं आपली चूक मान्य केली. यामुळं 2024-25 साठी कोणताही विजेता किंवा उपविजेता नाही.
Guyana and Barbados no show for critical CWI Governance Vote - Second time in history.
— Windies Cricket (@windiescricket) December 6, 2024
Read More🔽 https://t.co/i35gYCdEFn
कॅम्पबेलनं आतापर्यंत 28 सामने खेळले : जॉन कॅम्पबेलनं आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून 28 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 20 कसोटी, 6 वनडे आणि 2 आंतरराष्ट्रीय T20 सामील आहेत. कॅम्पबेलनं वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेटमध्ये 26.11 च्या सरासरीनं 888 धावा केल्या आहेत, ज्यात त्याच्या बॅटनं तीन अर्धशतकं झळकवली आहेत. वनडे सामन्यांमध्ये त्यानं 49.60 च्या सरासरीनं 248 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
हेही वाचा :