मेलबर्न WBBL Live Streaming in India : येत्या तीन ते चार महिन्यांत ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरच्या अखेरीस कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असताना दुसरीकडं आज म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून फ्रँचायझी आधारित बिग बॅश लीगचा 10वा महिला हंगाम सुरु झाला आहे. यावेळी महिला बिग बॅश लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ॲडलेड स्ट्रायकर्सचा सामना गत हंगामातील उपविजेत्या ब्रिस्बेन हीटशी होणार आहे. यावेळी भारतीय महिला संघातील 6 खेळाडूही बिग बॅश लीगच्या मोसमात खेळताना दिसणार आहेत. वेगवान गोलंदाज शिखा पांडे बिग बॅश लीगमध्ये प्रथमच ब्रिस्बेन हीटकडून खेळणार आहे.
Triple-header to open #WBBL10 💥
— Weber Women's Big Bash League (@WBBL) October 27, 2024
Get set for a super Sunday! pic.twitter.com/DJHrmwhE3S
शिखाशिवाय हे भारतीय खेळाडूही खेळताना दिसणार : WBBL च्या या 10व्या हंगामात, शिखा पांडे ब्रिस्बेन हीटकडून खेळत असताना, जेमिमाह रॉड्रिग्स देखील त्याच संघाचा एक भाग आहे. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाचा भाग आहे. दीप्ती शर्मा आणि यास्तिका भाटिया मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळताना दिसतील, तर पर्थ स्कॉचर्सनं डेलन हेमलथा यांचा समावेश केला आहे. शिखा व्यतिरिक्त इतर भारतीय खेळाडू अद्याप या मोसमात सहभागी होण्यासाठी आलेले नाहीत कारण या सर्व खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाचा भाग आहेत, ज्यामध्ये ही मालिका संपल्यानंतर हे सर्व खेळाडू सहभागी होतील.
More marquee matches played in world class stadiums 🏟️
— Weber Women's Big Bash League (@WBBL) July 8, 2024
The #WBBL10 schedule is here! pic.twitter.com/CRGpopIMUb
भारतात महिला बिग बॅश लीग सामन्यांचं थेट प्रक्षेपण केव्हा, कुठं आणि कसं पाहता येईल?
यावेळी भारतातील महिला बिग बॅश लीग सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल, याशिवाय हॉटस्टारच्या ॲप आणि वेब ब्राउझरवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण ऑनलाइन केलं जाईल. WBBL 2024-25 मध्ये पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळले जातील, ज्यात पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8:10 वाजता, दुसरा 11:40 वाजता सुरु झाला आहे तर तिसरा सामना दुपारी 3 वाजता सुरु होईल. महिला बिग बॅश लीगच्या या 10व्या हंगामातील अंतिम सामना 1 डिसेंबर रोजी खेळवला जाईल, ज्याचं ठिकाण हंगामाच्या मध्यभागी निश्चित केलं जाईल.
हेही वाचा :