पुणे Washington Sundar 7 Wickets Haul : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा डाव 259 धावांतर संपुष्टात आला. बंगळुरु कसोटी सामन्यात 8 गडी राखून झालेल्या पराभवानंतर, भारतीय संघानं या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 तीन मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला, ज्यात शुभमन गिलचं पुनरागमन निश्चित मानलं जात होतं. याशिवाय आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश होता. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यासोबतच वॉशिंग्टन सुंदरनं आतापर्यंतच्या खेळाच्या 2 सत्रांमध्ये आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. त्यानं सात विकेट घेत कीवी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
TAKE A BOW, WASHINGTON SUNDAR.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 24, 2024
- 7/59 after bowling for the first time in Test cricket in 45 months. Picking up career best First Class figures, a total mayhem in Pune. 🤯🔥 pic.twitter.com/KzPuMySvks
1329 दिवसांनी कसोटीत पुनरागमन : मार्च 2021 मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात वॉशिंग्टन सुंदरनं शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं आज कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. अशा स्थितीत पुणे कसोटी सामन्यात जेव्हा त्यानं रचिन रवींद्रला त्याच्या शानदार ऑफ-स्पिन चेंडूनं बाद करत सामन्यातली पहिली विकेट घेतली, तेव्हा त्याला 1329 दिवसांनी कसोटीत पहिली विकेट मिळाली. चौथ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यातील धोकादायक भागीदारी तोडण्याचं काम सुंदरनं केलं. तसंच यानंतर त्यानं सहा विकेट घेत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आहे.
Washington Sundar's seven-wicket haul bowls New Zealand out for 259.#WTC25 #INDvNZ 📝: https://t.co/JOcmCnisVQ pic.twitter.com/74Zr21ngRf
— ICC (@ICC) October 24, 2024
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न : बेंगळुरु कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ आता पुणे कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे. या सामन्यात किवी संघ 2 प्रमुख फिरकीपटूंसोबत खेळत आहे, ज्यात मिचेल सँटनरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. यात कीवींचा पहिला डाव 259 धावांत संपुष्टात आला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक सात विकेट घेतल्या. तर अश्विननंही 3 बळी घेत कीवींना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.
भारतीय फिरकीपटूंनी रचला इतिहास : भारताचे दोन फिरकीपटू आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मिळून संपूर्ण किवी संघ उद्ध्वस्त केला. अशाप्रकारे भारतीय भूमीवर नवा विक्रम निर्माण झाला. खरं तर, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्याचं भारतात सहाव्यांदा घडलं आहे. 1973 नंतर भारतीय भूमीवर असं घडण्याची ही दुसरी वेळ आहे. यावर्षीच धरमशाला इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या 10 विकेट्स घेतल्या होत्या. एकाच वर्षात दुसऱ्यांदा हा पराक्रम करुन भारतीय फिरकीपटूंनी नवा इतिहास रचला आहे.
Innings Break!
— BCCI (@BCCI) October 24, 2024
Superb bowling display from #TeamIndia! 💪
7⃣ wickets for Washington Sundar
3⃣ wickets for R Ashwin
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @Sundarwashi5 | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TsWb5o07th
फिरकीपटूनं भारतीय भूमीवर कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात सर्व 10 विकेट :
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, पुणे 2024
- भारत विरुद्ध इंग्लंड, धरमशाला 2024
- भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई 1973
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 1964
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता 1956
- इंग्लंड विरुद्ध भारत, कानपूर 1952
हेही वाचा :