नवी दिल्ली Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. याचाच अर्थ तो पहिले दोन सामने खेळणार नाही. बीसीसीआयनं सोमवारी ही माहिती दिली.
-
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Virat Kohli withdraws from first two Tests against England citing personal reasons.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENGhttps://t.co/q1YfOczwWJ
">🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) January 22, 2024
Virat Kohli withdraws from first two Tests against England citing personal reasons.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENGhttps://t.co/q1YfOczwWJ🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) January 22, 2024
Virat Kohli withdraws from first two Tests against England citing personal reasons.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENGhttps://t.co/q1YfOczwWJ
वैयक्तिक कारणांमुळे माघार : "विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली. विराटनं कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे", असं बीसीसीआयनं निवेदनात सांगितलं. "बीसीसीआय विराटच्या निर्णयाचा आदर करतं. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आता उर्वरित संघाकडून कसोटी मालिकेत कौतुकास्पद कामगिरी करण्याचा पूर्ण विश्वास आहे", असं बोर्डानं निवेदनात म्हटलं. विराटच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल.
रोहित शर्माकडे नेतृत्व : भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 25-29 जानेवारी, हैदराबाद
- दुसरी कसोटी - 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
- तिसरी कसोटी - 15-19 फेब्रुवारी, राजकोट
- चौथी कसोटी - 23-27 फेब्रुवारी, रांची
- पाचवी कसोटी - 7-11 मार्च, धर्मशाला
हे वाचलंत का :