नवी दिल्ली Virat Kohli Diet Plan : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली केवळ विक्रमच नाही तर फिटनेसमध्येही आघाडीवर आहे. तो 35 वर्षांचा असला तरी त्याची फिटनेस लेव्हल युवा खेळाडूंसारखी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार. मैदानावर बुलेट ट्रेनच्या वेगानं धावणाऱ्या कोहलीनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या फिटनेसचं रहस्य उघड केलं होतं. तसंच दिवसभराच्या आहाराबद्दल सांगितलं होतं.
कोहलीचा आहार कसा : क्रिकेट समालोचक जतिनला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीनं त्याच्या आहारातील काही रहस्यं सांगितली आहेत. नाश्त्यात कोहली अंड्याचं ऑम्लेट, उकडलेले मासे, पपई, ड्रॅगन फ्रूट, टरबूज, नियमित प्रमाणात चीज, नट बटरसह ब्रेड खातो. याशिवाय दिवसातून तीन ते चार कप ग्रीन टी घेतो. तर रात्री ग्रील्ड चिकन, बटाटे, हिरव्या भाज्या आणि सी फूड खातो. यासोबतच तो दुपारच्या जेवणाच्या आणि नाश्त्याच्या दरम्यान ड्रायफ्रुट्स खातो, ज्यामुळं त्याला तंदुरुस्त आणि चपळ राहण्यास मदत होते.
विराटचा व्यायाम कसा आहे : निरोगी आहारासोबतच कोहली व्यायामालाही भरपूर वेळ देतो. तो दिवसातून 2 तास जिममध्ये आपल्या शरीरासाठी वेळ देतो. आठवड्यातून एक दिवस विश्रांती घेतो. यात पोहण्याचाही समावेश आहे. सुरुवातीला कोहली जंक फूडही खायचा. पण कोहलीनंच यापूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, हे त्याच्या क्रिकेट करिअरसाठी घातक ठरेल आणि त्यानं आपली जीवनशैली बदलली आहे.
विराट कोहलीची तिन्ही फॉरमॅटमधील आकडेवारी :
- कसोटी : 113 सामने, 8848 धावा (29 शतकं/ 30 अर्धशतकं) सर्वोच्च धावसंख्या 254*
- एकदिवसीय : 295 सामने, 13906 धावा (50 शतकं/ 72 अर्धशतकं) सर्वोच्च धावसंख्या 183
- टी 20 आंतरराष्ट्रीय : 125 सामने, 4188 धावा (1 शतक / 38 अर्धशतकं) सर्वोच्च धावसंख्या 122*
हेही वाचा :
- विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू; कुठून कमावतो कोट्यवधी रुपये? - Virat Kohli Net Worth
- कार, बस, रेल्वेनं नव्हे तर स्वतःच्या 'प्रायव्हेट जेट'नं प्रवास करतात देशातील 'हे' दिग्गज क्रिकेटपटू - Indian Cricketers Private Jet
- विराट कोहलीकडे आहेत महागडी घड्याळं; किंमत बघून डोळे होतील पांढरे - Virat Kohli