कानपूर Virat Kohli Fan Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे अनेक चाहते तुम्ही पाहिले असतील, पण आज आम्ही एका चाहत्याची गोष्ट सांगत आहोत ज्यानं विराटची फलंदाजी पाहण्यासाठी तब्बल 58 किलोमीटर सायकल चालवली. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र, पहिल्या दिवशी पावसामुळं केवळ 35 षटकं टाकता आली आणि खेळ रद्द करावा लागला. फलंदाजी करताना बांगलादेशनं 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत.
A 15-year-old kid rode 58 kilometers on his bicycle just to watch Virat Kohli bat pic.twitter.com/rigqQBoCHq
— A (@_shortarmjab_) September 27, 2024
सायकलीवर केला 58 किलोमीटर प्रवास : एका 15 वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या या तरुण चाहत्यानं त्याची फलंदाजी पाहण्यासाठी 7 तास उन्नाव ते कानपूर अशी 58 किलोमीटर सायकल चालवली. विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी हा 15 वर्षांचा तरुण चाहता उन्नावहून कानपूरला पोहोचला. तब्बल 7 तास 58 किलोमीटर सायकलिंग करून ग्रीन पार्क स्टेडियमवर पोहोचलेल्या या चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, या लहान मुलानं आपलं नाव कार्तिकेय असल्याचं सांगितलं आणि 7 तासांचा प्रवास सायकलनं कसा केला हे देखील सांगितलं.
काय म्हणाला चाहता : चाहत्यानं सांगितलं की तो पहाटे 4 वाजता निघाला आणि 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्टेडियममध्ये पोहोचला. आई-वडिलांनी त्याला येण्यापासून रोखलं का, असं विचारलं असता? दहावीत शिकणाऱ्या कार्तिकेयनं सांगितलं की, त्यानं एकट्यानं प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र, विराट कोहलीची फलंदाजी पाहण्याची कार्तिकेयची इच्छा पहिल्या दिवशी पूर्ण होऊ शकली नाही, कारण भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं दिवसभर खेळ होऊ शकला नाही. कार्तिकेयचा व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडियावर त्याच्या आवडीचं कौतुक करत आहेत.
KING KOHLI IS AN EMOTION...!!!!! 🐐
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 27, 2024
- A 15 year old kid rode 58 Kilometres on his cycle from Unnav just to watch Virat Kohli batting. 🤯🙌pic.twitter.com/IrhlBrA3kl
पहिल्या दिवशी बांगलादेशच्या तीन विकेट : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ मुसळधार पावसामुळं लवकर संपला. खेळ थांबला तोपर्यंत बांगलादेशनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. या वेळी बांगलादेशनं उपाहारानंतरच्या सत्रात 9 षटकांत 33 धावा जोडल्यानंतर कर्णधार नझमुल हसन शांतो (31) याची विकेट गमावली. मुशफिकुर रहीम (6) आणि मोमिनुल हक (40) क्रीजवर होते. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळं मैदान ओलं झालं होतं, त्यामुळं दिवसाचा खेळ तासभर उशिराने सुरु झाला.
हेही वाचा :