चेन्नई Virat Kohli T20 Runs : आयपीएलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) रंगला. या सामन्यात विराट कोहलीनं टी20 क्रिकेटमध्ये विक्रम रचलाय. आजपर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनलाय.
पहिला भारतीय फलंदाज : विराट कोहलीनं टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा विराट हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरलाय. हा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला 360 इनिंग खेळाव्या लागल्या आहेत. सर्वात वेगवान 12 हजार धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
विराट कोहलीचीच हवा : टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावावर 12 हजार धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, शिखर धवन तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळं टी 20 फॉरमॅटमध्येही विराटचीच हवा असल्याचं दिसून येतंय.
भल्याभल्यांना टाकलं मागं : विराट कोलहीनं 377 टी 20 सामन्यांमध्ये हा विक्रम रचलाय. हा टप्पा गाठणारा कोहली हा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलनंतरचा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरलाय. ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. त्यामुळं आपल्या तळपत्या बॅटनं विराट कोहलीनं भल्याभल्यांना मागं टाकलंय.
टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज :
- विराट कोहली : १२ हजार धावा
- रोहित शर्मा: ११ हजार १५६ धावा
- शिखर धवन: ९ हजार ६४५ धावा
- सुरेश रैना: ८ हजार ६५४ धावा
- रॉबिन उथप्पा: ७ हजार २७२ धावा
हेही वाचा -