ETV Bharat / sports

टी20 विश्वचषक 2024 ; थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर मिळवला धडाकेबाज विजय, बुमराहनं फोडला घाम - T20 World Cup IND vs PAK - T20 WORLD CUP IND VS PAK

T20 World Cup IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट संघात न्यूयॉर्क इथं रविवारी टी20 विश्वचषकातील सामना खेळवण्यात आला. या थरारक सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर धडाकेबाज विजय मिळवला. कमी धावांचं लक्ष्य असतानाही भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघावर मात करण्यात यश मिळवलं.

T20 World Cup IND vs PAK
जल्लोष करताना भारतीय संघ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 7:13 AM IST

Updated : Jun 10, 2024, 8:22 AM IST

न्यूयॉर्क T20 World Cup IND vs PAK : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान संघावर थरारक विजय मिळवत टी20 विश्वचषकात आपले इरादे स्पष्ट केले. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत पाकिस्तान संघात खेळवण्यात आलेला हा सामना उशीरा सुरू झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानं उत्कृष्ठ गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाला 113 धावांवर गुंडाळण्यात यश मिळवलं.

भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पावसाच्या मदतीनं योग्य ठरवला. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी केली. मात्र पहिल्या षटकात रोहित शर्मानं एक षटकार ठोकून आपले इरादे स्फष्ट केल्यानंतर पावसानं व्यत्यय आणला. त्यानंतर उशीरा सुरू झालेल्या सामन्यात विराट कोहली केवळ 4 धावा काडून बाद झाला. त्याच्यापोठोपाठ रोहित शर्मा यानंही तंबूची वाट धरली. रोहित शर्मानं 13 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल यानं 20 धावांचं योगदान दिलं, तर ऋषभ पंतनं 42 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र अखेरच्या केवळ 30 धावांच्या मोबदल्यात भारतानं 7 गडी गमावले. अक्षर पटेल आणि ऋषभ पंतच्या धावांच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानी क्रिकेट संघापुढं 120 धावांचं आव्हान उभं केलं.

जसप्रित बुमराह, अर्शदीपनं घातली पाकस्तानी संघाला 'वेसण' : भारतीय क्रिकेट संघानं दिलेलं 120 धावांचं माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाला जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानं चांगलाच घाम फोडला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला जसप्रित बुमराहनं तंबूची वाट दाखवली. बाबर आझम यानं 13 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलनं उस्मान खान यालाही 13 धावांवर बाद करुन खळबळ उडवून दिली. हार्दिक पांड्यानं पुन्हा फकर झमान याला 13 धावांवरचं तंबूचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा जसप्रित बुमराह आपला जलवा दाखवत घातक ठरणाऱ्या मोहम्मद रिझवानला तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद रिझवान यानं 31 धावा काढल्या. त्यानंतर हार्दिक पांड्यानं शादाब खान आणि बुमराहनं इफ्तिखारला बाद करुन सामन्यावर पाकिस्तानी फलंदाजांचे मनसुबे उधळून लावले. जसप्रित बुमराहनं महत्याच्या 3, हारिद्क पांड्यानं 2 तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगनं प्रत्येकी 1 गड्याला तंबुचा रस्ता दाखवला. अखेर 113 धावांवर पाकिस्तान क्रिकेट संघाला गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

हेही वाचा :

  1. महिला टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान - ICC Womens T20 World Cup 2024
  2. टी 20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार; जाणून घ्या
  3. World Cup 2023 IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान संघात होणार 'महासंग्राम'; काय आहे आतापर्यंतचा इतिहास, वाचा सविस्तर

Last Updated : Jun 10, 2024, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.