ETV Bharat / sports

वेस्ट इंडिजचा ‘विराट’ विजय; 134 धावांच्या फरकानं युगांडाला चारली धुळ… - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडाचा 134 धावांनी पराभव केलाय. याआधी 2014 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध 39 धावांत गारद झाला होता.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 8:32 AM IST

Updated : Jun 9, 2024, 9:45 AM IST

WI vs UGA : टी-20 विश्वचषक 2024 च्या 18 व्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि युगांडा हे संघ आमनेसामने होते. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर या सामन्यात यजमानांनी मोठा विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांत गारद झाला आणि विडिंजनं 134 धावांनी मोठा विजय साकारला. अकिल हुसैनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर यजमानांनी सलग दुसरा विजय मिळवलाय. अकिल हुसेननं सर्वाधिक 5 बळी घेत युगांडाच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.

वेस्ट इंडिजनं मोठा विजय नोंदवला : वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी योग्य ठरला. वेस्ट इंडिजचा हा दुसरा विजय आहे. या संघानं पापुआ न्यू गिनीविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता. तर युगांडाविरुद्ध वेस्ट इंडिजनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखलं आणि मोठा विजय नोंदवला. याआधी 2014 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात नेदरलँडचा संघ श्रीलंकेविरुद्ध 39 धावांत गारद झाला होता.

वेस्ट इंडिजची फलंदाजी : वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स वेस्ट इंडिजकडून सलामीसाठी उतरले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची (28 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग बाद झाल्यावर संपुष्टात आली. किंगनं 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 13 धावा केल्या. त्यानंतर संघाला दुसरा धक्का युगांडाचा कर्णधार ब्रायन मसाबानं 10व्या षटकात निकोलस पूरनच्या रूपानं दिला. पुरणनं 17 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीनं 22 धावा केल्या.

यानंतर 13व्या षटकात जॉन्सन चार्ल्सच्या रूपानं वेस्ट इंडिजने तिसरी विकेट गमावली. चार्ल्सनं 42 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 44 धावा केल्या. त्यानंतर संघाला चौथा धक्का कर्णधार रोव्हमन पॉवेलच्या रूपानं बसला. पॉवेलनं 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 23 धावा केल्या. यानंतर 18व्या षटकात शेरफेन रदरफोर्ड पॅव्हेलियनमध्ये परतला. रदरफोर्डने 16 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावा केल्या. आंद्रे रसेल आणि रोमारियो शेफर्ड संघासाठी नाबाद राहिले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 33* (16 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान रसेलनं 17 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीनं 30* धावा केल्या आणि शेफर्डनं 5 चेंडूत 5* धावा केल्या.

युगांडाला स्वस्तात गुंडाळलं : 174 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची पहिली विकेट पहिल्याच षटकात पडली. अकील हुसेननं रॉजर मुकासाला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सायमन सेसाझीच्या (4 धावा) रूपानं संघाची दुसरी विकेट पडली. यानंतर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अल्पेश रामजानी (5 धावा) करत बाद झाला. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन ओबुया (06) च्या रूपानं युगांडाला चौथा धक्का बसला. यानंतर संघानं 19 धावांवर रियाजत अली शाहच्या रूपात पाचवी विकेट गमावली, जो 5 व्या षटकात अकील हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांत गारद झाला. संघाला शेवटचे दोन धक्के 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉस्मास क्यूवुटा (01) आणि 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फ्रँक न्सुबुगा (00) यांच्या रूपानं बसले.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी केला कहर : वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेननं सर्वाधिक 5 बळी घेतले. त्यानं 4 षटकात 2.80 च्या इकॉनॉमीसह 11 धावा दिल्या. याशिवाय अल्झारी जोसेफनं 2 बळी घेतले. अल्झारीनं 3 षटकात केवळ 6 धावा दिल्या. रेस्ट रोमारियो शेफर्ड, आंद्रे रसेल आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

दोन्ही संघ

  • वेस्ट इंडिजचा संघ : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, ब्रँडन किंग, रोस्टन चेस, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती.
  • युगांडाचा संघ : ब्रायन मसाबा (कर्णधार), सायमन सेसाजी (यष्टीरक्षक), रॉजर मुकासा, रौनक पटेल, रियाजत अली शाह, दिनेश नाक्रानी, ​​अल्पेश रामजानी, रॉबिन्सन ओबुया, बिलाल हसन, कॉस्मास क्यावुता, हेन्री सेन्योन्डो.

हेही वाचा

  1. भारत - पाकिस्तानमध्ये रंगणार आज सामना; दोन्ही संघाची कशी राहिली कामगिरी? - T20 World Cup 2024
  2. अफगाणिस्तानचा न्यूझीलंडला जोर का झटका... अफगाणिस्ताननं उडवला किवींचा धुव्वा...! - T20 World Cup 2024

Last Updated : Jun 9, 2024, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.