T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या विश्वचषकातील सुपर-8 फेरीत प्रवेश केलेल्या संघांची नावं समोर आली आहे. बांग्लादेश हा सुपरमध्ये प्रवेश करणार शेवटचा संघ ठरला आहे. क्रिकेट त्यामुळं आता सुपर 8-फेरीचे वेळापत्रक समोर आलं आहे. 19 जूनपासून सुपर 8-फेरीचे सामने खेळवले जातील. या फेरीसाठी 2 गट तयार करण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. आता सुपर-8 मधून सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी भारताकडं आहे.
पाकिस्तानचा पराभव करत पटकावलं विजेतेपद : भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद पटकावलं होत. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 षटकंही मैदानावर टिकाव धरता आली नाही. संपूर्ण संघ 19.3 षटकात 152 धावा करून ऑलआऊट झाला. भारतानं पहिला टी-20 विश्वचषक 5 धावांनी जिंकला.
17 वर्षांचा दुष्काळ संपणार? : भारताला 2007 नंतर पुन्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं विश्वचषक 2024 आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये तीन सामन्यात विजय मिळवला होता. आता सुपर-8 मधून सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी भारताकडं आहे. रोहितसेना 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार का? त्याकडं सर्वांच्या नजरा असतील.
सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट : भारतीय संघ आणि अमेरिका गट-अ मधून पात्र ठरले आहेत. ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनं प्रवेश केला आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजनं क गटातून स्थान मिळवलं आहे. तर ड गट गटातून दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असतील. या दोन्ही गटातून दोन संघ अव्वल राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताशिवाय ग्रुप-1 मध्ये बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता इंग्लंड यांना गट-2 मध्ये ठेवण्यात आले आहे.
सुपर 8 मधील भारताचे सामने : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 20 जून रोजी बार्बाडोस येथे सुपर-8 टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर दुसरा सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. या सामन्यात बांगलादेशशी सामना होणार आहे. भारतीय संघ सुपर-8 मधील शेवटचा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे खेळणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण हा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सुपर-8 मधील भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.
सुपर 8 चा गट
- गट-1: भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान
- गट-2: अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका
टी-20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 सामन्यांचं वेळापत्रक
- 19 जून - अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, रात्री 8 वाजता
- 20 जून - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट लुसिया, सकाळी 6 वाजता
- 20 जून - अफगाणिस्तान विरुद्ध भारत, बार्बाडोस, रात्री 8 वाजता
- 21 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, सकाळी 6 वाजता
- 21 जून - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट लुसिया, रात्री 8 वाजता
- 22 जून - अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज, बार्बाडोस, सकाळी 6 वाजता
- 22 जून - भारत विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, रात्री 8 वाजता
- 23 जून - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वाजता
- 23 जून - अमेरिका विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस, रात्री 8 वाजता
- 24 जून - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, सकाळी 6 वाजता
- 24 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सेंट लुसिया, रात्री 8 वाजता
- 25 जून - अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वाजता
- 27 जून - उपांत्य फेरी 1, गयाना, सकाळी 6 वाजता
- 27 जून - उपांत्य फेरी २, त्रिनिदाद, रात्री 8 वाजता
- 29 जून - फायनल, बार्बाडोस, रात्री 8 वाजता
हेही वाचा
- भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर दणदणीत विजय; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण - IND W vs SA W
- ऑस्ट्रेलियाच्या विजयानं इंग्लंडचं चमकलं नशीब, 'या' एका कारणामुळे सुपर 8 मध्ये मिळाला प्रवेश - T20 World cup 2024
- ''मॅच खेळवूच नका…''; भारत-कॅनडा सामना रद्द झाल्यानं सुनील गावसकर आयसीसीवर संतापले - T20 World Cup 2024
- पाकिस्तानला पराभवाची धूळ चारणारा सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण? - Saurabh Netravalkar Biography