ETV Bharat / sports

''मॅच खेळवूच नका…''; भारत-कॅनडा सामना रद्द झाल्यानं सुनील गावसकर आयसीसीवर संतापले - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024 : भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडामध्ये होणारा सामना पावसामुळं रद्द करावा लागला. यावर आता दिग्गज सुनील गावस्कर यांनी याबाबत आयसीसीला फटकारलंय. संपूर्ण बातमी वाचा...

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 7:41 AM IST

T20 World Cup 2024 IND vs CAN : भारतीय क्रिकेट संघानं सलग तीन विजय नोंदवत आयसीसी टी-20 विश्वचषक सुपर 8 मध्ये स्थान मिळवलंय. भारताचा शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता. मात्र पावसामुळं सामना रद्द करण्यात आलाय. वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जावे यासाठी आयसीसीनं अनेक प्रयत्नही केले. पण खेळताना काही संघांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय. फ्लोरिडामधील भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानं भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आयसीसीवर चांगलेच भडकले आहेत.

अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील सामन्यातील बहुतेक सामने पावसामुळं अडचणीत आले आहेत. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे पावसामुळं लागोपाठ दोन सामने रद्द झाले. त्यामुळं पाकिस्तानसारखा बलाढ्य संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत आता भारताच्या माजी क्रिकेटपटूनंही आयसीसीला फटकारलं आहे. अमेरिकेतील सुविधा पाहून कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी निराशा व्यक्त केलीय.

सामना रद्द झाल्यानं सुनील गावस्कर संतापले : भारत आणि कॅनडा यांच्यात शनिवारी होणारा सामनाही पावसामुळं रद्द करण्यात आला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या मुद्द्यावरून आयसीसीला फटकारलंय. ते म्हणाले की, ''आयसीसीनं संपूर्ण मैदान पावसापासून सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी टी-20 विश्वचषक सामने आयोजित करण्याची परवानगी देऊ नये. एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही फक्त खेळपट्टी कव्हर्सनं झाकली. उर्वरित मैदान पावसाच्या पाण्यानं ओलं होतंय. तुम्ही असे करू शकत नाही.''

मायकेल वॉनही वैतागला : भारत- कॅनडा यांच्यात होणारा सामनाही पावसामुळं सामना रद्द झाल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही वैतागला. मायकेल वॉन यांनी ट्विट केले, ''संपूर्ण मैदान कव्हर करण्यासाठी अधिक कव्हर्स कसे नाहीत, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. सामन्यांमध्ये सगळा पैसा गुंतवला आहे. तरीही ओल्या आउटफिल्डमुळं सामने रद्द करण्यात येत आहेत.'' अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे यंदाच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजक आहेत.

मैदान झाकण्यासाठी कव्हर उपलब्ध नव्हतं : फ्लोरिडामध्ये 11 जूनपासून सतत पाऊस पडत आहे. परंतु ब्रॉवर्ड स्टेडियममधील व्यवस्था इतकी खराब होती की, संपूर्ण मैदान झाकण्यासाठी कव्हर उपलब्ध नव्हतं. एवढ्या मुसळधार पावसात फक्त खेळपट्टीवर फक्त कव्हर टाकण्यात आलं. साधनसामग्रीच्या कमतरतेमुळं एकाच वेळी संपूर्ण मैदानातील पाणी काढणं सोपं नव्हतं. त्यामुळं भारत आणि कॅनडा सामनाही रद्द करावा लागला.

  • फ्लोरिडामध्ये पावसामुळं 3 सामने रद्द : फ्लोरिडामध्ये 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी 4 सामने होणार होते. त्यापैकी 3 सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात एक शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे. पावसामुळं हा सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे.

सुपर-8 मध्ये भारत 'या' 3 संघांशी भिडणार : भारतीय क्रिकेट संघानं आधीच सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 20 जूनला भारतीय संघ अफगाणिस्तानशी, 22 जूनला बांगलादेशशी आणि 24 जूनला ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.

हेही वाचा

  1. शेवटच्या षटकाचा थरार...नेपाळचा धक्कादायक पराभव; आफ्रिकेनं एका धावेनं जिंकला सामना - T20 World Cup 2024
  2. टी20 विश्वचषक 2024: भारत आणि कॅनडा संघात आज रंगणार टी20 चा थरार; मात्र सामन्यावर पावसाचं सावट - T20 World Cup 2024
  3. न्यूझीलंडचं टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगलं; अफगाणिस्ताननं वाट अडवली, कसं ते वाचा... - T20 World Cup 2024
  4. टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा धुमाकूळ, अवघ्या 19 चेंडूत 'खेळ संपला' - T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.