ETV Bharat / sports

पॅट कमिन्सचा धडाका! टी-20 विश्वचषकात सलग दुसरी हॅट्रिक करणारा ठरला पहिला खेळाडू - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 11:46 AM IST

Pat Cummins Record Hat Trick : ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्सनं आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं तीन चेंडुत तीन विकेट घेत दुसऱ्यांदा हॅट्रिक घेतली. टी-20 विश्वचषकात कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे.

Pat Cummins Hat Trick
Pat Cummins Hat Trick (Source- ETV Bharat)

Pat Cummins Record Hat Trick : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचला आहे. अफगाणिस्तानच्या सुपर-8 सामन्यात पॅट कमिन्सनं हॅट्रिक केलीय. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्वही त्यानं हॅट्रिक केली होती. सलग 2 सामन्यात पॅट कमिन्सनं 2 वेळा हॅट्रिक केली आहे. टी20 क्रिकेटच्या सामन्यांमध्ये विकेट घेत दोनवेळा हॅटट्रिक करणारा कमिन्स हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

विश्वचषकात सलग 2 सामन्यात 2 वेळा हॅट्रिक घेणारा पॅट कमिन्स पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात कमिन्सनं 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. यासह त्यानं टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याआधीच्या सामन्यात पॅट कमिन्सनं बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. कमिन्सनं बांगलादेशच्या महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि तौहीद हृदय या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत हॅट्रिक केली होती. कमिन्सनं अफगाणिस्तानविरुद्ध 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रशीद खानला बाद केलं. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर करीम जनतला ड्रेसिंग रूममध्ये पाठवलं. यानंतर दुसऱ्या चेंडूवर (19.2 षटकं) गुलबदीन नायबला बाद केलं. कमिन्सनं या विश्वचषकात आतापर्यंत 4 सामने खेळले आहे. त्यानं 4 डावात 10.66 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतल्या आहेत.

टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारे गोलंदाज

  • ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश – 2007
  • कर्टिनस कॅम्पर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड्स - 2021
  • वानिंदू हसरंका (श्रीलंका) विरुद्ध – 2021
  • कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड – 2021
  • कार्तिक मयप्पन (अमेरीका) विरुद्ध श्रीलंका – 2022
  • जोशुआ लिटल (आयर्लंड) विरुद्ध न्यूझीलंड – 2022
  • पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश – 2024
  • पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध अफगाणिस्तान - 2024

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज

  • ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
  • ॲश्टन आगर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2020
  • नॅथन एलिस विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2021
  • पॅट कमिन्स विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024
  • पॅट कमिन्स विरुद्ध अफगाणिस्तान, किंग्सटाउन, 2024*

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.