नवी दिल्ली T20 World Cup : आयसीसी टी 20 विश्वचषकात सुपर-8 फेरीचे सामने खेळले जात आहेत. यात दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. गट 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका संघाला गट 2 मधून बाहेर पडावं लागलं आहे. तर गट 1 मधील स्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांना वेगवेगळी समीकरणं साधत मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.
The host nations have never won the T20 World Cup in the 9 editions that played so far. pic.twitter.com/DOJnKI7Fln
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2024
दोन्ही यजमान संघ बाद : आज दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील गट 2 च्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला 3 गड्यांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यासोबतच घरच्या संघाला आतापर्यंत झालेल्या 9 टी 20 विश्वचषक स्पर्धेत कधीही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यावेळी वेस्ट इंडिजला ट्रॉफी ही परंपरा मोडण्याची संधी होती पण दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानं ते बाहेर पडले आहेत. यंदाचा म्हणजेच नववा टी 20 विश्वचषक संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांनी आयोजित केला. मात्र आता दोन्ही यजमान संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिका उपांत्य फेरीतून बाहेर पडले आहेत.
कोणत्या देशानं कधी आयोजित केला टी 20 विश्वचषक कोणत्या टप्प्यात यजमान संघ पडला बाहेर?
- पहिल्याच 2007 च्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन दक्षिण आफ्रिकेनं केलं होतं आणि यजमान संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. भारतानं हा विश्वचषक जिंकला होता.
- दुसरा टी 20 विश्वचषक 2009 साली इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात यजमान इंग्लंड संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. पाकिस्ताननं हा विश्वचषक जिंकला होता.
- यानंतर 2010 मध्ये तिसऱ्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन वेस्ट इंडिजनं केलं होतं. यातही यजमान वेस्ट इंडिज संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. इंग्लंड या विश्वचषकात विजेता ठरला होता.
- चौथा टी 20 विश्वचषक 2012 साली खेळवण्यात आला. याचं यजमानपद श्रीलंकेनं भूषवलं होतं. मात्र यजमान संघ अंतिम फेरीत वेस्ट इंडिजकडून 36 धावांनी पराभूत होऊन ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. वेस्ट इंडिजनं अंतिम सामन्यात विजय मिळवत पहिल्यांदाच टी 20 विश्वचषक जिंकला.
- पाचव्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन 2014 मध्ये बांगलादेशनं केलं होतं. मात्र यातही यजमान संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. हा विश्वचषक श्रीलंकेनं जिंकला होता.
- 2016 मध्ये सहाव्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. मात्र यात यजमान भारतीय संघ उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून 7 गड्यांनी पराभूत होऊन ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. वेस्ट इंडिजनं अंतिम सामन्यात विजय मिळवत दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला होता.
- सातव्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन 2021 साली संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमाननं संयुक्तपणे केलं होतं. यात यजमान ओमान संघ पहिल्या टप्प्यातूनच बाहेर पडला, तर UAE संघ पहिल्या टप्प्याचा भागही नव्हता. ऑस्ट्रेलियानं या हंगामात अंतिम सामन्यात विजय मिळवत पहिल्यांदाच टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं.
- आठव्या टी 20 विश्वचषकाचं आयोजन 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. या हंगामातही यजमान संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. या हंगामात इंग्लंडनं विजय मिळवला होता.
- सध्या नवव्या टी 20 विश्वचषक 2024 चं आयोजन अमेरिका (यूएसए) आणि वेस्ट इंडीज यांनी केलं आहे. मात्र यंदाही दोन्ही यजमान संघ सुपर-8 फेरीतून बाहेर पडले आहेत. या हंगामाचा विजेता अद्याप निश्चित झालेला नाही.
हेही वाचा :
- वनडे विश्वचषकाचा बदला घेण्यासाठी 'रोहितसेना' सज्ज; कांगारूं संघाचं करणार पॅकअप? - T20 World Cup 2024
- बटलरच्या वादळी खेळीनंतर इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक! अमेरिकेचा 10 गडी राखून केला पराभव - T20 World Cup 2024
- स्मृती मंधानाच्या झुंझार खेळीनं भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’, एकदिवसीय मालिका 3-0 ने घातली खिशात - INDW vs SAW