IND vs PAK : भारतीय संघान आयसीसी टी-20 विश्वचषक 2024च्या 19 व्या सामन्यात पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेल्या 120 धावांचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानचा भारताच्या गोलंदाजांनी चांगलाच घाम काढला. या सामन्यात पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यांनतर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. वेगनान गोलंदाजा अर्शदीप सिंह यानं भारताकडून शेवटचं षटक टाकली. भारतानं पाकिस्तानला 113 धावांवर रोखलं. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता. या सामन्याच्या काही तासानंतर वादाला तोंड फुटलं आहे.
हरभजनन सिंह संतापला : पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज कामरान अकमल यानं अर्शदीप सिंह याच्यावर केलेल्या विधानावरुन भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह संतापलाय. हरभजनन नक्की का संतापला? कामराननं काय विधान केलं होत?
कामरान अकमलचं वादग्रस्त विधान : न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अर्शदीप सिंगनं भारतासाठी शेवटचं षटक टाकलं. त्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या. पण पाकिस्तान संघ केवळ 11 धावा करू शकला. 6 धावांच्या फरकानं पाकिस्ताननं सामना गमावला. यानंतर, पाकिस्तानमधील एका टीव्ही शोमध्ये सामन्याचं विश्लेषण करतानाचा व्हिडिओ समार आला. कामरान अकमलनं व्हिडिओत म्हटले, “अर्शदीप सिंहला शेवटचं षटक टाकायचं आहे. तसा तो रंगात दिसत नाही. तुम्हाला माहित आहे 12 वाजले आहेत”. यानंतर कामरान अकमल हसायला लागतो. कामरानसह असलेले इतर एक्सपर्ट्स म्हणतात, “शीखांना 12 वाजता ओव्हर द्यायला नको”. हरभजननं त्यांच्या या विधानावरुन संताप व्यक्त करत प्रत्युत्तर दिलंय.
हरभजनकडून प्रत्युत्तर : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हरभजननं कामरानवर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानं पोस्टमध्ये म्हटले, ''घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी शीखांचा इतिहास जाणून घ्यावा. आम्ही शीखांनी तुमच्या आई-बहिणींचा अपहरणकर्त्यांकडून बचाव केलाय. वेळ 12 वाजताची होती. लाज वाटली पाहिजे…थोडी कृतज्ञता बाळगा.''
कामरान अकमलनं मागितली माफी : हरभजन सिंगच्या या पोस्टनंतर आणि सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा कामरान अकमलनं ट्विटरवर पोस्ट केली. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मला माझ्या टिप्पणीबद्दल मनापासून खेद वाटत आहे. हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मी मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मी जगभरातील शीखांचा आदर करतो. माझा कधीही कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता.''
भारताकडून पाकिस्तानचा पराभव : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघानं 19 षटकांत 10 गडी गमावून 119 धावा केल्या. पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळं रोहित शर्माच्या सेनेनं सामना 6 धावांनी जिंकला. या सामन्यात बुमराहने एकूण 3 विकेट घेतल्या. त्यानं आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटनं केवळ 14 धावा दिल्या. सामना भारताच्या बाजूनं वळवला. या शानदार कामगिरीसाठी बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. यापूर्वी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहनं पाकिस्तानविरुद्ध 19 धावांत दोन बळी घेतले होते. तेव्हाही तो सामनावीर ठरला होता.
हेही वाचा
- भारत-पाकिस्तान सामना ठरला अखेरचा; 'एमसीए' अध्यक्ष अमोल काळेंचं अमेरिकेत निधन - Amol Kale Passed Away
- पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींचा जल्लोष, पहा व्हिडिओ - T20 World Cup 2024
- दक्षिण आफ्रिका- बांगलादेशमध्ये रंगणार वर्ल्डकप सामन्याचा थरार! जाणून घ्या, कोण ठरलंय आजवर वरचढ? - T20 World cup 2024
- बूम..बूम..बूमराह…! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रचला 'हा' मोठा विक्रम - IND Vs Pak