Gulbadin Naib Fake Injury : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या सुपर-8 सामन्यात बांगलादेशचा पराभव करून अफगाणिस्ताननं इतिहास रचला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे बांगलादेशचा 8 धावांनी पराभव करत अफगाण संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. या विजयासह बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचं टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगलं. अफगाणिस्तानच्या विजयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Bangladesh 🆚 Afghanistan| ICC Men's T20 World Cup
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 25, 2024
Moments of Bangladesh's Bowling 🇧🇩💛
Photo Credit: ICC/Getty#BCB #Cricket #BANvAFG #T20WorldCup pic.twitter.com/VBLp4SkJrj
नेमकं काय घडलं? : बांगलादेशच्या डावाच्या 12 व्या षटकात गुलबदिन नायबची झालेली दुखापत क्रिकेटविश्वात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार धावसंख्येपेक्षा थोडा पुढं होता. सामन्या दरम्यान अनेकदा पाऊस पडल्यामुळं खेळात व्यत्यय येत होता. याचाच फायदा घेत अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी डग आऊटमधून खेळाडूंना इशारा करत सामना लांबवण्याचा इशारा दिला.
Wow, what a medical marvel!
— CRICKET JUNOON®️ (@Cricktjunoon) June 25, 2024
Gulbadin Naib ran faster than everyone else in the team after suffering and recording from a serious groin injury caused by a collision with the AIR.
Miracle in medical sciences. Hats off to @GbNaib. @ACBofficials #AFGvBAN
pic.twitter.com/OghXLhSMQs
गुलबदीन नायब हा स्लिपमध्ये उभा होता. तो अत्यंत नाट्यमय पद्धतीनं पायाला धरून मैदानावर पडला. आपल्याला दुखापत झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळं सामना लांबला. अफगाणिस्तानचा फिजिओ मैदानात आला. त्यात पावसाचं आगमन झाल्यामुळं सामना थांबवावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघ पिछाडीवर होता. बांगलादेशला 19 षटकात 114 धावा करायच्या होत्या. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकात 105 धावा करू सर्वबाद झाला. हा सामना अफगाणिस्तानने 8 धावांनी जिंकला.
look at Gulbadin Naib 😭😭
— UMESH (@USigdel) June 25, 2024
miraculous recovery from that hamstring injury. running like crazy. pic.twitter.com/zFuzFme56C
गुलबदिन नाईबच्या दुखापतीवर इंग्लडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने संताप व्यक्त केला आहे. मायकेल वॉन गुलबदिन नाईबची खिल्ली उडवली आहे. त्यानं म्हटलं की, ''दुखापत झाल्यानंतर 25 मिनिटांत विकेट घेणारा गुलबदिन हा खेळाच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. हे पाहून आनंद झाला…''
What are your thoughts on Gulbadin Naib's Injury?👀🌧️
— Super11 (@Super11games) June 25, 2024
Comment below!#afgvsban #gulbadinnaib #bangladesh #t20wc2024 #SportsInjury #T20Injury#CricketInjury #GetWellSoonGulbadin #SportsInjury pic.twitter.com/2DLXm7pn2x
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं ट्विटरवर गुलबदीनचा खरपूस समाचार घेत लिहिलं की, 'गुलबदिन नायबला रेडकार्ड.'
Rank the Injury Drama in order:
— سیاسی بات (@Siyasi_Aadmi) June 25, 2024
1. Ahmed Shahzad
2. Gulbadin Naib
3. Imam-ul-Haq
4. Muhammad Rizwan
Ahmed Shahzad still holds the first place ...#AfgvsBan pic.twitter.com/Zs3YpuaxvR
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिन गोलंदाज ॲडम झाम्पानं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला. झाम्पानं गुलबदिन नाईबच्या दुखापतीचा खरपूस समाचार घेत इंग्रजीत ‘रेनस्ट्रिंग’ असं लिहित नायबवर संताप व्यक्त केलाय.
Red card for Gulbadin Naib😂😂😂
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) June 25, 2024
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान स्मिथनं लिहिलं की, 'गेल्या सहा महिन्यांपासून मला गुडघेदुखीचा त्रास होत आहे. मी थेट गुलबद्दीन नायबच्या डॉक्टरकडे जाईन. सध्या हे जगातील आठवे आश्चर्य आहे.
Great to see Gulbadin become the first cricketer in the history of the game to get a wicket 25 mins after being shot …
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 25, 2024
हेही वाचा
- ऑस्ट्रेलियाच्या टी 20 विश्वचषकातील प्रवास संपताच डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम - David Warner retired
- ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं, अफगाणिस्ताननं बांगलादेशचा केला 8 धावांनी पराभव - T20 World Cup 2024
- ''काय करायचं हे आम्ही...''; ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माचं इंग्लंडला खुलं आव्हान! - T20 World Cup 2024
- विश्वचषकातील वचपा काढला; टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, 'रो'हिट' वादळा'ची सेमीफायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री - T20 World Cup India Beat Australia