ETV Bharat / sports

सुपर ओव्हरच्या थरारात अमेरिकेकडून पाकिस्तानचा पराभव; मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर ठरला विजयाचा शिल्पकार - T20 World Cup 2024

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 च्या 11व्या सामन्यात यजमान अमेरिकेचा संघ पाकिस्तानशी भिडला. डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. यात पाकिस्तानचा अमेरिकेनं पराभव करत इतिहास रचलाय. विशेष म्हणजे या सामन्यात अमेरिकेकडून खेळणारा मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर हा विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 7:53 AM IST

डल्लास T20 World Cup 2024 USA vs PAK : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना अमेरिका ( USA) आणि पाकिस्तान यांच्यात डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. यूएसएचा संघानं 20 षटकांत केवळ 159 धावा केल्यानं सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अमेरिका संघाकडून लाजिरवाणा पराभव झाला.

  • सुपर ओव्हरमध्ये ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंग अमेरिकेकडून फलंदाजीला आले. दोघांनी 18 धावा करत पाकिस्तानला 19 धावांचं लक्ष्य दिलं. यानंतर 19 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 6 चेंडूत केवळ 13 धावा करता आल्या.

सुपर ओव्हरचा थरार : सुपर ओव्हरमध्ये यूएसएनं प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरनं सुपर ओव्हर टाकायचा निर्णय झाला. पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजी यामुळं अमेरिकेच्या फलंदाजांनी 18 धावा केल्या. 19 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने नांगी टाकली. इफ्तिकारनं एक चौकार लगावत आशा पल्लवित केल्या. पण सौरभच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा इफ्तिकारचा प्रयत्न नितीशच्या अफलातून झेलमुळं यशस्वी झाला नाही. पण सौरभनं भेदक गोलंदाजी करत अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

पाकिस्तानचा सुरुवातीचा डाव फसला : पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज नॉस्तुश केन्झिगेनं 30 धावांत तीन बळी घेतले. त्यामुळं पाकिस्तान संघ सात विकेट्सवर केवळ 159 धावा करू शकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य ठरला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात स्टीव्हन टेलरने सौरभ नेत्रावलकरच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर फखर जमानने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचव्या षटकात अली खानच्या चेंडूवर तो बाद झाला. पाकिस्ताननं 26 धावांत तीन विकेट गमावल्या. मोहम्मद रिझवान 9 धावा करून, उस्मान खान 3 आणि फखर जमान 11 धावा करून बाद झाला.

अमेरिकेची फलंदाजी : 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएसएची सुरुवात चांगली झाली. कारण कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीव्हन टेलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानच्या धोकादायक वेगवान आक्रमणासमोर अमेरिकेनं पॉवरप्ले ओव्हर्समध्ये केवळ 1 गडी गमावून 44 धावा केल्या होत्या. यूएसएनं 10 षटकात 76 धावा केल्या होत्या. संघाच्या हातात 9 विकेट शिल्लक होत्या. कर्णधार मोनांकनं 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14व्या षटकात हॅरिस रौफनं 35 धावांवर अँड्रिस गॉसला क्लीन बोल्ड केलं. गॉस आणि पटेल यांच्यातील 68 धावांची भागीदारी संपुष्टात आली. सामना अमेरिकेच्या बाजूनं जाईल असं वाटत होते. परंतु 15 व्या षटकात मोहम्मद अमीरनं 50 धावांवर मोनांक पटेलला बाद केलं. शेवटच्या 5 षटकात अमेरिकेला विजयासाठी 45 धावा करायच्या होत्या. मोहम्मद आमिरनं 19व्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. त्यामुळं सामना पाकिस्तानच्या ताब्यात गेला. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. पण हॅरिस रौफनं 14 धावा दिल्या, त्यामुळं सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

बाबर आझमनं विराटचा विक्रम मोडला : या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमची संथ खेळी पाहायला मिळाली. पण या संथ खेळीनंही तो विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरलाय. 16 धावा करत बाबर आझमनं आपल्या टी-20 कारकिर्दीत 4039 धावा पूर्ण केल्या. यासह टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 4038 धावा आहेत.

  • पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
  • युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कर्णधार), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.