Rohit Sharma T20 Retirement : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत आयसीसी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले. भारताचे हे दुसरे टी-20 आणि आयसीसीचे चौथे विजेतेपद ठरले. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे भारताच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. कोहलीने अंतिम सामन्यात त्याने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली.
भारताच्या या विजयानंतर सामनावीरचा पुरस्कार घेताना कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या या घोषणेनंतर काही वेळातच कर्णधार रोहित शर्मानेदेखील त्याचा निर्णय सांगून टाकला. आयसीसीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही ही माहिती दिली आहे. आयसीसीनं लिहिलं की, "विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे."
Pure Joy and Emotions 🥹 🥳#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/WBrLOoEbd4
— BCCI (@BCCI) June 29, 2024
37 वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं शनिवारी टी-20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. पण यानंतर कोहली आणि रोहितने टी-20 मधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
💬💬 𝗧𝗵𝗶𝘀 𝘄𝗮𝘀 𝗺𝘆 𝗹𝗮𝘀𝘁 𝗧𝟮𝟬 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽: Virat Kohli
— BCCI (@BCCI) June 29, 2024
King Kohli bids adieu to the T20I format in style and mutual admiration for Captain Rohit Sharma 👏 🫡
Take A Bow on that glorious T20I career! 🙌#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @imVkohli pic.twitter.com/xqur8qmHDF
विश्वचषक जिंकायचा होता : सामन्यानंतर रोहित म्हणाला, "हा माझा शेवटचा सामना आहे. या फॉरमॅटला अलविदा करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. या फॉरमॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. मी या फॉरमॅटमध्ये खेळून भारतासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. मला हेच हवे होते. मला हा विश्वचषक जिंकायचा होता. मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाहीय. शब्दात व्यक्त करता येत नाही. काल रात्री, मला झोपही येत नव्हती. कारण मी हताश होतो. ट्रॉफी मिळवण्याची वाट पाहत होतो. मी मैदानात स्वतःला चांगल्याप्रकारे सावरले."
Rohit Sharma said " no better time to say goodbye from this format - i loved every bit, i wanted to win this trophy".
— T20 World Cup 2024 Commentary (@T20WorldCupClub) June 29, 2024
happy retirement legend 💗 #ViratKohli𓃵 #RohitSharma𓃵 pic.twitter.com/v6e0X2FL5l
निवृत्तीची घोषणा करताना रोहितने कोच राहुल द्रविड यांचेही आभार मानले. तो म्हणाला, "त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी गेल्या 20 ते 25 वर्षात खुप काही केलं आहे. ही एकमेव गोष्ट शिल्लक होती. मी आणि संपूर्ण संघ खूप आनंदी आहोत की, आम्ही त्यांच्यासाठी हे करू शकलो."
The celebrations have begun in Barbados 🥳
— BCCI (@BCCI) June 29, 2024
A round of applause for the ICC Men's T20 World Cup 2024 winning side - Team INDIA 🇮🇳🙌#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/OElawo7Xha
रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द : रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन टी-20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. रोहितने 2007 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- एकूण टी-20 सामने : 159
- धावा : 4231
- सरासरी : 32.05
- स्ट्राइक रेट : 140.89
- शतके : 5
- अर्धशतक : 32
- षटकार : 205
- चौकार : 383
It's your Captain Rohit Sharma signing off from T20Is after the #T20WorldCup triumph! 🏆
— BCCI (@BCCI) June 29, 2024
He retires from the T20I cricket on a very special note! 🙌 🙌
Thank you, Captain! 🫡#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/NF0tJB6kO1
कोहलीचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा : या सामन्यातील 76 धावांच्या शानदार खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीरचा किताब देण्यात आला. सामन्यानंतर तो म्हणाला, ''हा माझा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. हा माझा शेवटचा टी-20 विश्वचषकही होता. हे सरप्राईज मी फायनलसाठी जपून ठेवले होते. युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच वेळ आहे. रोहित शर्मानं 9 टी-20 विश्वचषक खेळले आहेत. हा माझा सहावा विश्वचषक होता. रोहित हा विजयासाठी सर्वात जास्त पात्र आहे."
कोहलीची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द : कोहलीने एकूण 125 टी-20 सामने खेळले. या काळात त्याने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राईक रेटने 4188 धावा केल्या. त्याच्या नावावर T20 मध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतक आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 124 षटकार आणि 369 चौकार लगावले.
हेही वाचा
- भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; अंतिम सामन्यानंतर कोहलीचा टी-20 क्रिकेटला अलविदा - Virat Kohli T20 Retirement
- भारताचा 'हार्दिक' विजय... 17 वर्षांनी टीम इंडिया टी-20 चा 'विश्वविजेता' - T20 World Cup Final
- टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी महिला भारतीय संघानं रचला इतिहास; कांगारुंचा 'हा' विक्रम नेस्तनाबूत - INDW vs SAW Only Test