ETV Bharat / sports

स्टीव्ह 'रन मशीन' स्मिथ... लंकेविरुद्ध एक धाव घेताच सचिन, द्रविडला टाकलं मागे - STEVE SMITH RECORD

श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथनं आपलं खातं उघडताच इतिहास रचला. स्मिथनं एक धाव काढताच सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला.

Steve Smith
स्टीव्ह स्मिथ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 29, 2025, 1:20 PM IST

गॉल Steve Smith : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 29 जानेवारीपासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डावाची सुरुवात शानदार पद्धतीनं केली आणि केवळ 14 षटकांतच 91 धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकात, अर्धशतक झळकावून ट्रॅव्हिस हेड बाद झाला. 15 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाला मार्नस लाबुशेनच्या रुपानं आणखी एक मोठा धक्का बसला. 20 धावा काढून लाबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ नवीन फलंदाज म्हणून मैदानात आला आणि त्यानं एक धाव घेताच मोठा विक्रम रचला.

स्टीव्ह स्मिथच्या नावावर रेकॉर्ड : प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन स्मिथनं कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. कसोटीत 10,000 धावा करणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकूण 15वा फलंदाज ठरला. 115व्या कसोटी सामन्याच्या 205 व्या डावात स्मिथनं ही मोठी कामगिरी केली. यासह, स्मिथनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांचे मोठे विक्रम मोडले. स्मिथनं 115 कसोटी सामन्यांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या, तर सचिन तेंडुलकरनं 122 कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा (सामन्यांनुसार) :

  • ब्रायन लारा - 111 सामने
  • कुमार संगकारा - 115 सामने
  • स्टीव्ह स्मिथ - 115 सामने
  • युनूस खान - 116 सामने
  • रिकी पॉन्टिंग - 118 सामने
  • जो रूट - 118 सामने
  • राहुल द्रविड - 120 सामने
  • सचिन तेंडुलकर - 122 सामने

जर आपण कसोटी डावांबद्दल बोललो तर, स्मिथनं राहुल द्रविडपेक्षा कमी डावांमध्ये 10 हजार क्लबमध्ये स्थान मिळवलं. द्रविडनं 206 डावांमध्ये हा विक्रम केला तर स्मिथनं 205 डावांमध्ये 10 हजार धावांचा आकडा गाठला. सर्वात कमी डावांमध्ये 10 हजार कसोटी धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लारानं 195 डावांमध्ये 10,000 धावा केल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 10,000 धावा करणारे फलंदाज :

  • ब्रायन लारा - 195 डाव
  • सचिन तेंडुलकर - 195 डाव
  • कुमार संगकारा - 195 डाव
  • रिकी पॉन्टिंग - 196 डाव
  • राहुल द्रविड - 206 डाव

कसोटीत 10,000 धावा करणारे सर्व फलंदाज :

  • सुनील गावस्कर
  • अ‍ॅलन बॉर्डर
  • स्टीव्ह वॉ
  • ब्रायन लारा
  • सचिन तेंडुलकर
  • राहुल द्रविड
  • रिकी पॉन्टिंग
  • जॅक कॅलिस
  • महेला जयवर्धने
  • शिवनारायण चंद्रपॉल
  • कुमार संगकारा
  • अ‍ॅलिस्टर कुक
  • युनूस खान
  • जो रुट
  • स्टीव्ह स्मिथ

हेही वाचा :

  1. वरुण 'रेकॉर्ड ब्रेक' चक्रवर्ती... टीम इंडियाच्या पराभवातही पठ्ठ्यानं केले विक्रम
  2. WTC च्या शेवटच्या मालिकेत यजमान पाहुण्यांवर भारी पडणार? ऐतिहासिक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.