मुंबई 6 Day Test Match : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1990 च्या दशकात सहा दिवसीय कसोटी सामने सामान्य होते, विशेषतः इंग्लंडमध्ये. यात एक दिवस विश्रांतीचा होता. म्हणजे संघ फक्त 5 दिवस खेळले, पण खेळाडूंनी मधल्या एक दिवस विश्रांती घेतली. मात्र, आधुनिक क्रिकेटमध्ये हे दिसत नाही. पण आता आधुनिक क्रिकेटमध्येही 6 दिवसांचा कसोटी सामना होणार आहे, असं जाहीर करण्यात आलं आहे. या निर्णयामागं मोठं कारण आहे.
A 6 DAY TEST MATCH NEXT MONTH...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2024
- Sri Lanka Vs New Zealand 1st Test will commence from 18th Sep to 23rd Sep, there'll be a rest day on 21st Sep due to Presidential Elections in Sri Lanka. pic.twitter.com/IStlsx2Zzy
5 नव्हे तर 6 दिवस खेळणार कसोटी सामना : श्रीलंका क्रिकेटनं न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. श्रीलंकेची न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सप्टेंबरमध्ये सुरु होत आहे. 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणारा पहिला कसोटी सामना 6 दिवस चालणार आहे. श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी सामन्यात हा दिवस विश्रांतीचा दिवस असेल. म्हणजेच या दिवशी सामना खेळला जाणार नाही आणि दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबरला जिथं सोडला होता तिथून सामना सुरु होईल. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा सामना 26 सप्टेंबरपासून खेळवला जाईल, जो फक्त 5 दिवस चालेल.
कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचा 6 दिवसांचा सामना कधी खेळला गेला? : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शेवटच्या वेळी 6 दिवसांचा कसोटी सामना 2008 साली खेळवण्यात आला होता. त्यावेळी श्रीलंकेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर होता. मीरपूरमधील पहिली कसोटी 26-31 डिसेंबर रोजी नियोजित होती, बांगलादेशातील संसदीय निवडणुकांमुळं 29 डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस होता. त्याच वेळी, श्रीलंकेत विश्रांती दिवसासह खेळलेला शेवटचा कसोटी सामना 2001 मध्ये होता. हा सामना कोलंबोमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला.
दोन्ही संघांसाठी मालिका महत्त्वाची : 2023 च्या सुरुवातीला न्यूझीलंड आणि श्रीलंका शेवटच्या वेळी कसोटी मालिकेत आमनेसामने आले होते. ज्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर 2-0 नं पराभूत केले होते. त्याच वेळी, न्यूझीलंडनं शेवटचा 2019 मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता, ज्यात कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेचा विचार करता आगामी मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा :