ETV Bharat / sports

उपांत्य फेरीत सातवेळा पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका अखेर 32 वर्षांनी अंतिम फेरीत; वाचा संघाचा निराशाजनक इतिहास - South Afica in T20 World Cup Final

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 10:06 PM IST

South Afica in T20 World Cup Final : वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करुन प्रथमच अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तब्बल 32 वर्षांनंतर या संघानं उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.

South Afica
दक्षिण आफ्रिका (ICC)

त्रिनिदाद South Afica in T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं आता 'चोकर्स' नसल्याचं सिद्ध केलंय. या संघानं अखेर उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आयसीसी विश्वचषकाच्या (एकदिवसीय आणि टी 20) बाद फेरीत दक्षिण आफ्रिकेला पुन्हा पुन्हा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी, आफ्रिकन संघ कोणत्याही विश्वचषकाच्या (1992, 1999, 2007, 2009, 2014, 2015 आणि 2023) उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तब्बल 32 वर्षांनंतर या संघानं उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. त्रिनिदाद इथं झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करुन प्रथमच अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय.

आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक भूतकाळ :

  • 1992 एकदिवसीय विश्वचषक ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरी : वर्णभेदामुळं 21 वर्षांच्या हकालपट्टीचा सामना केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक होते. पण उपांत्य फेरीत पावसानं हजेरी लावली आणि 7 चेंडूत 22 धावांऐवजी त्यांना एका चेंडूत 22 धावा करण्याचे 'अशक्यप्राय' सुधारित लक्ष्य देण्यात आलं. निश्चितच त्यांना यात पराभव पत्करावा लागला.
  • 1996 एकदिवसीय विश्वचषक वेस्ट इंडिज विरुद्ध उपांत्यपूर्व फेरी : सर्व साखळी सामने जिंकल्यानंतर हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखालील आफ्रिका संघ वरचढ मानला जात होता. परंतु ब्रायन लाराच्या उत्कृष्ट फलंदाजीनंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज रॉजर हार्पर आणि जिमी ॲडम्स यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आणि 19 धावांनी पराभूत झाले.
  • 1999 विश्वचषक ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरी : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात निराशाजनक सामना. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला लान्स क्लुसनर आफ्रिकेसाठी 'ट्रॅजेडी किंग' ठरला. विजयासाठी 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 9 धावा कराव्या लागल्या. शेवटची जोडी क्रीजवर होती. क्लुसनरनं पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारले, पण पुढच्याच चेंडूवर ॲलन डोनाल्ड धावबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. मात्र सुपर सिक्स फेरीत अव्वल स्थानी राहिल्यानं ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरी गाठली.
  • 2007 विश्वचषक ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरी : या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय चुकीचा ठरला. ग्रॅमी स्मिथ, हर्शल गिब्स, जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स आणि मार्क बाउचर सारखे खेळाडू 149 धावांवर बाद झाले. परिणामी 20 षटकं शिल्लक ठेवत ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला.
  • 2009 टी 20 विश्वचषक पाकिस्तान विरुद्ध उपांत्य फेरी : दक्षिण आफ्रिकेनं या विश्वचषकात न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारताचा पराभव करुन अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पण शाहिद आफ्रिदीच्या शानदार फिरकी गोलंदाजीसमोर संघाला दीडशे धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही.
  • 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरी : दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 8 बाद 80 धावा होती. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि रॉरी क्लेनवॉल्ट यांनी संघाला 175 धावांपर्यंत पोहोटवलं. प्रत्युत्तरात जोनाथन ट्रॉटच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 12 षटकं आणि सात विकेट्स शिल्लक असताना विजय मिळवला.
  • 2014 टी 20 विश्वचषक भारत विरुद्ध उपांत्य फेरी : भारतीय संघानं चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
  • 2015 एकदिवसीय विश्वचषक न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरी : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंची चांगली पिढी, प्रत्येक विभागात उत्कृष्ट खेळाडू, पण ते उपांत्य फेरीत हरले. न्यूझीलंडनं पुन्हा एकदा उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन त्यांची मनं मोडली.
  • 2022 टी 20 विश्वचषक नेदरलँड विरुद्ध सुपर 12 फेरी : उपांत्य फेरीपासून एक विजय दूर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 13 धावांनी पराभव करुन नेदरलँड्सनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
  • 2023 एकदिवसीय विश्वचषक ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरी : साखळी फेरीत चमकदार कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ अंतिम चारमधील महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा 'चोकर्स' ठरले.

आयसीसीनं केलं होतं निलंबित : दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं असे काही नियम केले होते, ज्यामुळं आयसीसी संभ्रमात पडली होती. त्यांच्या सरकारी नियमांनुसार, त्यांच्या देशाच्या संघाला फक्त पांढऱ्या देशांविरुद्ध (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) खेळण्याची परवानगी होती. विरोधी संघात फक्त पांढरे खेळाडूच खेळतील, अशीही अट होती. त्यामुळं आयसीसीनं दक्षिण आफ्रिकेला निलंबित केलं होतं. अखेर 21 वर्षांनंतर (1991 मध्ये) तो दिवस आला जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या नियमांत बदल झाला आणि तेथील वर्णभेदाचं धोरण संपुष्टात आलं आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं.

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; पहिल्यांदाच अंतिम फेरीत मारली धडक - T20 World Cup 2024
  2. मायकल वॉनसमोर मुंबईच्या टॅक्सी चालकाकडून 'फिक्सिंग'चा सिक्सर, पाहा व्हिडिओ - Michael Vaughan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.