सेंच्युरियन SA vs PAK T20I : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाची सातत्यानं लाजिरवाणी कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यांना मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्यांचा 7 विकेट्सनं एकतर्फी पराभव झाला आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं फलंदाजीत चांगली कामगिरी करताना 20 षटकात 206 धावा केल्या, पण गोलंदाजीत संघाला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकांत तीन विकेट्स गमावत लक्ष्य गाठलं.
South Africa win the second T20I by seven wickets following Reeza Hendricks' century.#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/4w8QbPzWjs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 13, 2024
रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन डर ड्युसेन यांची उपयुक्त खेळी : या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 28 धावांवर रायन रिकेल्टन आणि मॅथ्यू ब्रेत्झके यांच्या विकेट्स गमावल्या. येथून, रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन डर डुसेन यांनी आफ्रिका संघाच्या डावाची जबाबदारी तर घेतलीच पण वेगानं धावा काढण्याची प्रक्रियाही सुरु केली. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 157 धावांची मॅच-विनिंग पार्टनरशिप झाली, ज्यामुळं पाकिस्तानला मॅचमधून पूर्णपणे काढून टाकलं. दक्षिण आफ्रिकेसाठी, त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही चौथी सर्वात मोठी भागीदारी होती.
1️⃣0️⃣0️⃣0️⃣up for Klaasen
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 13, 2024
Captain Klaasen brings up 1000 T20i runs for the Proteas. 🇿🇦
The cherry on top of a win in Centurion over Pakistan!🍒👏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/RxoCgLX8yD
सर्वाधिक धावा काढणारा दुसरा खेळाडू : रीझा हेंड्रिक्सच्या बॅटमधून 63 चेंडूत 117 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. ज्यात त्यानं 7 चौकार आणि 10 षटकारही ठोकले. यासह रिझा आता आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू आहे. या सामन्यात व्हॅन डर डुसेननं 66 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेलं. याआधी हेंड्रिक्सनं T20 मध्ये केवळ 17 अर्धशतकं झळकावली होती. त्याला पहिलं T20I शतक करण्यासाठी 10 वर्षे लागली.
Rassie takes us home!🫡
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 13, 2024
Rassie vd Dussen played a phenomenal knock of 66* as he took our Proteas over the line after Reeza’s superb century!🤗🇿🇦😁#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/V5XbuYJjxY
28 महिन्यांनंतर जिंकली मालिका : हेंड्रिक्सच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यांनी हा सामना 7 विकेटनं जिंकूत T20 मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेनं 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पहिला T20 सामना त्यांनी 11 धावांनी जिंकला होता. यासह 28 महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा T20 मालिका विजय आहे. ऑगस्ट 2022 मध्ये शेवटची T20 मालिका जिंकली होती.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 13, 2024
The Proteas take an unassailable 2-0 lead in the 3-match KFC T20i Series now.😎🏏
🇿🇦South Africa win by 7 wickets
Bring on the 3rd and final match tomorrow night at the DP World Wanderers Stadium!🏟️#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/wehev3AoNS
दक्षिण आफ्रिका तिसरा संघ : T20 इंटरनॅशनलमध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाचव्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य पार केलं आहे, ज्यासह हा या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा संघ बनला आहे ज्यानं 200 किंवा त्याहून अधिक धावांचं लक्ष्य पाच किंवा अधिक वेळा पाठलाग केलं आहे. या यादीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे, ज्यानं आतापर्यंत 7 वेळा ही कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी यापूर्वी 5 वेळा हा पराक्रम केला आहे.
A stunning Proteas chase in Centurion 🇿🇦#SAvPAK 👉 https://t.co/3A9kezl9Lc pic.twitter.com/aBhQAD7Abw
— ICC (@ICC) December 13, 2024
हेही वाचा :