हैदराबाद Shreyas Iyer : तामिळनाडूत सुरू होणाऱ्या बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत श्रेयस अय्यर मुंबई संघाकडून खेळणार आहे. श्रेयस 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान कोईम्बतूर येथे जम्मू-काश्मीर विरुद्ध मुंबईच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळणार आहे. भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही या सामन्यात खेळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील यांनी माहिती दिली की, "श्रेयस अय्यर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणार आहे. तो 27 ऑगस्ट 2024 पासून कोईम्बतूर येथे होणाऱ्या मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामना खेळणार आहे."
सरफराज खानकडे मुंबई संघाची कमान : बुची बाबू स्पर्धेत सरफराज खान मुंबई संघाचं नेतत्त्व करणार आहे. संघाचा नियमित कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असल्यांमुळे सर्फराजकडे कर्णधार साेपवण्यात आलं आहे.
श्रेयस अय्यरची कामगिरी : 29 वर्षीय श्रेयस अय्यरने मुंबईसाठी 72 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 48.82 च्या सरासरीनं 5664 धावा केल्या आहेत. नाबाद 202 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 14 कसोटी सामन्यात त्यानं 36.86 च्या सरासरीनं 811 धावा केल्या आहेत. भारतासाठी कानपूर विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातून त्यानं कसोटीत पदार्पण केलं. या वर्षाच्या सुरुवातीला विशाखापट्टणम येथे इंग्लंड विरुद्ध श्रेयसने शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. भारतासाठी त्याने आतापर्यंत 62 एकदिवसीय आणि 51 टी-20 सामने खेळले आहेत.
बुची बाबू स्पर्धा कधीपासून सुरू? : स्पर्धा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. उपांत्य फेरीचा सामना 2 सप्टेंबर, तर 8 सप्टेंबरला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ भाग घेणार आहेत.
हेही वाचा