ETV Bharat / sports

रक्तानं माखलेली जर्सी, शरीराला प्रचंड वेदना... तरीही योद्ध्यानं मानली नाही हार, जिंकला मालिकावीर पुरस्कार

पाकिस्तानच्या संघानं तब्बल 4 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी इंग्लंडचा 2-1 असा दारुण पराभव केला.

Sajid Khan Blood on Jersey
साजिद खान (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 26, 2024, 5:22 PM IST

रावळपिंडी Sajid Khan Blood on Jersey : खेळाचं मैदान असो वा युद्धाचं. प्रत्येक खेळाडू आणि योद्ध्याची एकच इच्छा असते की मैदानावर असं काहीतरी करावं ज्याची उदाहरणं वर्षानुवर्षे दिली जातील. असाच एक पराक्रम पाकिस्तानचा खेळाडू साजिद खाननं केला आहे. रावळपिंडी इथं इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ अडचणीत सापडला होता आणि त्यांना महत्त्वपूर्ण भागीदारीची गरज होती. आपल्या फिरत्या चेंडूंनी ब्रिटीशांना अडचणीत आणणाऱ्या साजिदला फलंदाजीतही देशासाठी काहीतरी अविस्मरणीय कामगिरी करण्याची संधी होती. साजिदनंही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. फलंदाजी करताना, चेंडू त्याच्या हेल्मेटला छेदून त्याच्या चेहऱ्यावर आदळला, पण तोही साजिदचा उत्साह कमी करु शकला नाही. त्याची जर्सी रक्तानं भिजली होती आणि वेदना शरीरावर वर्चस्व गाजवत होत्या, पण साजिद एखाद्या योद्ध्याप्रमाणे खेळपट्टीवर उभा होता.

साजिदची संस्मरणीय खेळी : साजिद खान फलंदाजीला मैदानात आला तेव्हा पाकिस्तान संघ अडचणीत आला. संघाला इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरीही करता येणार नाही, असं एकेकाळी वाटत होतं. पण साजिदनं ड्रेसिंग रुममधून काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि मैदानात आला होता. साजिदनं मैदानावर खंबीरपणे उभं राहून सौद शकीलच्या साथीनं 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. फलंदाजी करत असताना डावाच्या 91व्या षटकात रेहान अहमदविरुद्ध शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना एक चेंडू साजिदच्या हनुवटीवर आदळला. यानंतर साजिदच्या हनुवटीला दुखापत झाली आणि फिजिओला धावत मैदानात यावं लागलं. काही वेळातच साजिदची पांढरी जर्सी रक्तानं माखली, पण पाकिस्तानच्या फलंदाजानं आपली फलंदाजी सुरुच ठेवली. साजिदनं मैदान सोडण्यास स्पष्ट नकार दिला. मिशीला ताव देत साजिद क्रीजवर राहून दोन चौकार आणि चार गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 48 धावांची दमदार खेळी खेळली आणि तो नाबाद राहिला.

Sajid Khan Blood on Jersey
साजिद खान (AFP Photo)

गोलंदाजीतही साजिदची जादू : फलंदाजीपूर्वी साजिद खाननंही गोलंदाजीत आपलं कौशल्य दाखवलं होतं. पाकिस्तानच्या फिरकीपटूनं पहिल्या डावात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. साजिदनं जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स या फलंदाजांना बाद केलं. केवळ या कसोटी सामन्यातच नाही तर या मालिकेतही साजिद पाकिस्तानचा मसिहा बनला आहे. मुलतान कसोटीतील शानदार विजयातही साजिदचा मोठा वाटा होता. या मालिकेतील 4 डावात साजिदनं एकूण 19 इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याच्या या विक्रमी कामगिरीसाठी त्याला मालिकावीरच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं या मालिकेतील 2 सामन्यांत फलंदाजीत 72 धावा काढल्या तर गोलंदाजीत 19 विकेट घेतल्या.

हेही वाचा :

  1. ऐतिहासिक...! पाकिस्ताननं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच केलं 'असं', विश्वास बसणंही कठीण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.