ETV Bharat / sports

नाशिकच्या 'साहिल'ची भारतीय क्रिकेट संघात निवड; 'रोहित'सह दाखवणार 'जलवा' - Sahil Parakh - SAHIL PARAKH

Sahil Parakh : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची भारतीय संघात निवड झाली आहे.

Sahil Parakh
साहिल पारख (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 2, 2024, 6:45 PM IST

Updated : Sep 4, 2024, 11:50 AM IST

नाशिक Sahil Parakh : नाशिकच्या समस्त क्रीडाप्रेमी व खास करुन क्रिकेट रसिकांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची 19 वर्षांखालील वयोगटातील भारतीय संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठीच्या भारतीय संघात, साहिल पारखची हि निवड बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी घोषित केली. पॉंडिचेरी इथं 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान 19 वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवासीय सामन्यांची मालिका होत आहे. भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ इतर देशांशी आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतो, तसंच आयसीसीतर्फे नियमितपणे 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकही आयोजित करण्यात येत असतो.

Sahil Parakh
साहिल पारख (ETV Bharat Reporter)

नाशिकचा खेळाडू भारतीय संघात : नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. साहिलच्या रुपानं नाशिकचा खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमसीएतर्फे नव्या 2024-25 हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहे. साहिल पारख 26 एप्रिल ते 22 मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता. त्यापूर्वीच्या हंगामात देखील 16 वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हिव्हिएस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए बेंगळुरुतर्फे भारतभरातील उदयोन्मुख, युवा खेळाडूंसाठी हे शिबीर झालं. साहिल पारेखचं शिबिर नाडियाद इथं पार पडलं. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच 19 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती.

साहिल पारखची दमदार कामगिरी : साहिलनं मागील 2023-24 च्या हंगामात राज्यस्तरीय आमंत्रितांच्या (सिनियर इन्व्हिटेशन लीग) टी-20 क्रिकेट स्पर्धेत वरिष्ठ खुल्या गटात खेळताना 3 सामन्यात 184 च्या स्ट्राइक रेटनं एकूण 164 धावा काढल्या. याच हंगामात इंदोर इथं झालेल्या बीसीसीआयच्या 19 वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघानं बलाढ्य मुंबई संघावर 115 धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवलं. बीसीसीआयच्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखनं 9 डावांत 2 शतकं व एका अर्धशतकासह 366 धावा काढल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची 19 वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती. बीसीसीआयची ही 19 वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा 3 ते 9 नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी इथं झाली. त्याआधी 16 वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी (इन्व्हिटेशन लीग), स्पर्धेतील जोरदार कामगिरीमुळं 16 वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळताना बीसीसीआय विजय मर्चंट ट्रॉफीतही साहिलनं आपल्या आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. त्यात सुरत इथं खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलनं केवळ 149 चेंडूत 35 चौकार व 4 षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद 224 धावा फटकावल्या होत्या व नंतर आसाम विरुद्ध अर्धशतक केलं होतं.

Sahil Parakh
साहिल पारख (ETV Bharat Reporter)

नाशिकचे अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या संघात : नाशिकचा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहणं हे स्वप्न साकार करायचं आहे, असं मनोगत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा यांनी व्यक्त केलं होतं. गेल्या दोन दशकांपासून चेअरमन विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली, सचिव समीर रकटे व समिती नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहेत. या दरम्यान एनडीसीएनं दोनदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संघटनेचा पुरस्कार मिळवला आहे. नाशिकचे अनेक पुरुष व महिला क्रिकेटपटू विविध वयोगटात राज्य व राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत.

संघात राहुल द्रविडच्या मुलाचा सहभाग : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवासीय सामन्यांत साहिल पारखकडून जोरदार कामगिरीची अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत. साहिलसह 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा किरण चोरमाळे, तसंच राहुल द्रविडचा सुपुत्र समित हे देखील या चमूत निवडले गेले आहेत.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पंगालिया, समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन.

हेही वाचा :

  1. राहुल द्रविडचा मुलगा ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाजवणार मैदान, भारतीय संघात निवड - IND U19 vs AUS U19

Last Updated : Sep 4, 2024, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.