ETV Bharat / sports

मराठमोळा ऋतुराज गायकवाड 'चेन्नई सुपर किंग्ज'चा नवा कर्णधार - Ruturaj Gaikwad is new captain - RUTURAJ GAIKWAD IS NEW CAPTAIN

CSK New Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीनं एक मोठी घोषणा केली आहे. यंदा महेंद्रसिंग धोनीच्या जागी मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

CSK New Captain
CSK New Captain
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 5:26 PM IST

चेन्नईचा चौथा कर्णधार CSK New Captain : आयपीएल क्रिकेट हंगाम सुरु होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई संघानं मोठी घोषणा केलीय. महाराष्ट्रातील अष्टपैलू खेळाडू ऋतुराज गायकवाडची चेन्नई संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याच्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

ऋतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार : 27 वर्षीय स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा, सुरेश रैना यांनी चेन्नईचं कर्णधारपद भूषवलंय. धोनीनं 212 सामन्यात चेन्नई संघाचं नेतृत्व केलं आहे. जडेजानं 8 तर रैनानं 5 सामन्यात कर्णधारपद भूषवलंय.

धोनीच्या नेतृत्वात पाच वेळा चेन्नई चॅम्पियन : 42 वर्षीय धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळतोय. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघानं 2023 च्या शेवटच्या हंगामातही विजेतेपद पटकावलं होतं. अंतिम फेरीत त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख केला जातो.

मागील वर्षीच्या निर्णयाची पुनरावृत्ती : आयपीएल 2022 मध्येही चेन्नई संघानं एक दिवस आधी नवीन कर्णधाराची घोषणा केली होती. तेव्हा रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांच्या या निर्णयाचा उलटसुलट परिणाम झाला. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची कामगिरी खराब होती. जडेजाची स्वतःची कामगिरीही निष्प्रभ ठरली. परिणामी त्यानंतर जडेजाच्या जागी धोनीला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती.

मुंबईपाठोपाठ चेन्नईनं बदलला कर्णधार: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स संघानही महेंद्रसिंग धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवल्यानं रोहित शर्मासह महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यावर्षी रोहितसह धोनीच्या कर्णधार पदाची चुणूक चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघानंही मागील वर्षीच विराट कोहलीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसला कर्णधार पदी नियुक्त केलं होतं. थोडक्यात यावर्षीपासून भारतीय क्रिकेटमधले तीनही दिग्गज कर्णधाराच्या भूमिकेत नव्हे, तर खेळाडूच्या भूमिकेत आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

हे वाचलंत का :

  1. Hardik Pandya : रोहित शर्माचं संघात कोणतं स्थान? हार्दिक पंड्यानं थेटच सांगितलं....
  2. WPL 2024 Final: आरसीबीला 16 वर्षांच्या 'विराट' अपयशानंतर अखेर डब्ल्यूपीएलमधून मिळाली विजेते पदाची 'स्मृती'
  3. Ranji Trophy 2024 Final : रणजीमध्ये मुंबईच 'अजिंक्य', 15 धावांत 5 विकेट्स घेत विदर्भाचा 169 धावांनी पराभव; 42व्यांदा जिंकली स्पर्धा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.