मुंबई Rohit Sharma Fitness : बांगलादेश क्रिकेट संघ पाकिस्तानला त्याच्याच मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 नं पराभूत करुन भारतात येणार आहे. इकडे कर्णधार रोहित शर्मा मालिकेच्या तयारीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. याच्या तयारीसाठी त्यानं क्रिकेटचं मैदान नव्हे तर जिमची निवड केली आहे.
CAPTAIN ROHIT SHARMA working hard in the Gym ahead of the Test season. 🇮🇳 pic.twitter.com/8DnxWgdnOU
— Johns. (@CricCrazyJohns) September 7, 2024
जिममध्ये घाम गाळतोय रोहित : एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा अनुभवी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. भारतीय कर्णधार यात धावण्यासोबत टायरचा व्यायाम करताना दिसतो. 'हिटमॅन' शर्मा ज्या प्रकारे टायरवर व्यायाम करत आहे. त्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.
Captain Rohit Sharma working hard in the gym ahead of Test series vs Bangladesh. 🙌
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 7, 2024
- THE HITMAN IS GETTING READY TO RULE..!!!! 🔥pic.twitter.com/F9u0k3xKn9
बांगलादेशविरुद्ध रोहितची कामगिरी कशी : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाले तर, त्यानं बांगलादेशविरुद्ध एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, त्यानं फलंदाजीत 3 डावात 11.00 च्या सरासरीनं केवळ 33 धावा आल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या 21 आहे. दरम्यान, त्यानं विरोधी संघाविरुद्ध 4 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
CAPTAIN ROHIT SHARMA working hard in the Gym ahead of the Test season. 🇮🇳 pic.twitter.com/VJfYX0sFFr
— 𝓐𝓭𝓲 🇮🇳 (@ImAdiRo_) September 7, 2024
कधीपासून सुरु होणार मालिका : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेशचा संघ भारतीय दौऱ्यावर 2 कसोटी आणि 3 T20 सामने खेळणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. यानंतर 3 T20 सामने खेळवले जातील. पहिला T20 सामना 6 ऑक्टोबर, दुसरा 9 ऑक्टोबर आणि तिसरा T20 सामना 12 ऑक्टोबरला खेळवला जाईल. यातील कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाईल.
हेही वाचा :