चेन्नई Rohit Sharma Record : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं 280 धावांनी विजय मिळवला. अश्विन, जडेजा, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनीही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माला फलंदाजीत चमत्कार करता आला नसला तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
Part of Most wins for India in History:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 22, 2024
Virat Kohli - 322*
Rohit Sharma - 308*
- Two GOATs of Cricket. 🐐 pic.twitter.com/EumjA7nhZ3
रोहितनं टाकलं सचिनला मागे : एक खेळाडू म्हणून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा रोहित आता जगातील चौथा खेळाडू बनला आहे. या बाबतीत रोहितनं 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू रिकी पाँटिंग आहे. 377 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्यात पॉन्टिंगचा सहभाग आहे. त्याच वेळी, जयवर्धनेनं 336 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली आहे. कोहलीनं 322 आणि रोहितनं 308 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत खेळाडू म्हणून 307 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते.
Rohit Sharma now has 2nd Most wins as a player for India in International Cricket History.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 22, 2024
- THE HITMAN, THE ALL TIME GREAT. 🐐 pic.twitter.com/N1NZBaBjoE
सर्वाधिक सामने जिंकण्याचा भाग असणारे खेळाडू :
- 377 : रिकी पाँटिंग
- 336 : महेला जयवर्धने
- 322 : विराट कोहली*
- 308 : रोहित शर्मा*
- 307 : सचिन तेंडुलकर
अश्निन ठरला सामनावीर : दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करुन 1-0 अशी आघाडी घेतली. विजयासाठी 515 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हसन शांतोनं सर्वाधिक 82 धावांचं योगदान दिलं. भारताकडून रविचंद्रन अश्विननं सहा तर रवींद्र जडेजानं तीन विकेट घेतल्या. मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळवला जाणार आहे.
हेही वाचा :
- अश्विन अण्णा हैं तो मुमकिन है...! चेन्नईत बांगलादेशचा पराभव करत अश्विननं पाडला विक्रमांचा पाऊस - Ashwin Records Chennai Test
- बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा; संघात कोणते बदल? - IND vs BAN Kanpur Test Squad
- भारताच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापलथ; बांगलादेशला 440 व्होल्टचा धक्का - WTC Pont Table