मॉन्ग कॉक (हाँगकाँग) 6 Sixes in 1 Over : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारानं इतिहास रचला आहे. एका षटकात 6 षटकार मारणारा तो जगातील 11वा खेळाडू ठरला आहे. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय सिक्सेस स्पर्धेत भारताविरुद्ध 39 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं हे विशेष यश संपादन केलं आहे. माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं भारतीय संघासाठी डावातील चौथं षटक टाकलं. ज्यात रवी बोपारा खूपच आक्रमक दिसत होता. त्यानं पहिल्या 5 चेंडूत 5 उत्कृष्ट षटकार ठोकले. त्यानंतर उथप्पाचा पुढचा चेंडू वाईड झाला. त्यानंतर बोपारानं शेवटच्या चेंडूवरही गगनचुंबी षटकार ठोकून इतिहासाच्या पानात आपलं नाव नोंदवलं.
𝗪𝗮𝘁𝗰𝗵 𝗼𝘂𝘁! ⚠️
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 2, 2024
The skipper of England, Ravi Bopara is raining sixes in Hong Kong!🔥#HongKong #AsiasWorldCity #Cricket #ItsRainingSixes pic.twitter.com/mDckwXkeEP
रवी बोपारानं अवघ्या 14 चेंडूत केल्या 53 धावा : सामन्यादरम्यान रवी बोपारा भारताविरुद्ध अतिशय आक्रमक दिसला. संघासाठी डावाची सुरुवात करताना त्यानं केवळ 14 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 378.57 च्या स्ट्राइक रेटनं 53 धावा (रिटायर्ड हर्ट) करण्यात यशस्वी झाला. यात त्यानं 8 उत्कृष्ट षटकार मारले. बोपारा व्यतिरिक्त माजी इंग्लिश अष्टपैलू समित पटेलनंही भारताविरुद्ध चांगली फलंदाजी केली. सलामी करताना त्यानं एकूण 18 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्यानं 283.33 च्या स्ट्राइक रेटनं 51 धावा (रिटायर्ड हर्ट) चं योगदान दिले. पटेलनं या उत्कृष्ट खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार लगावले.
रॉबिन उथप्पानं दिल्या 1 षटकात 37 धावा : भारताकडून कर्णधार रॉबिन उथप्पा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं संघासाठी फक्त 1 षटक टाकलं. दरम्यान, 37.00 च्या इकॉनॉमीमध्ये 37 धावा देण्यात आल्या. यात त्याला कोणतंही यश मिळालं नाही.
Another win for England as they emerge victorious against India by 15 runs! 🏴#HongKong #AsiasWorldCity #Cricket #ItsRainingSixes pic.twitter.com/T9srl6lB5u
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 2, 2024
इंग्लंड 15 धावांनी विजयी : सामन्याच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड संघ 15 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी झाला. मॉन्ग कॉकमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघानं 6 षटकांत 1 गडी गमावून 120 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 6 षटकांत 3 गडी गमावून 105 धावाच करु शकला. संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना माजी क्रिकेटपटू केदार जाधवनं अवघ्या 15 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी केली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
Ravi Bopara making a late bid to be part of England's white-ball reset?#HongKongSixes pic.twitter.com/peoZTaX0U8
— Andrew McGlashan (@andymcg_cricket) November 2, 2024
1 षटकात 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंची यादी :
- सर गॅरी सोबर्स
- रवी शास्त्री
- हर्शेल गिब्स
- युवराज सिंग
- रॉस व्हाइटली
- हजरतुल्ला झाझई
- लिओ कार्टर
- किरॉन पोलार्ड
- थिसार परेरा
- जसकरण मल्होत्रा
- ऋतुराज गायकवाड
- रवी बोपारा
हेही वाचा :