मुंबई Ranji Trophy Day 3 : मुंबईने रणजी चषकाच्य फायनलमध्ये (Mumbai vs Vidarbha Final Highlights) विदर्भापुढे 538 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भानं बिनबाद 10 धावा केल्या. मुंबईकडून दुसऱ्या डावात मुशीर खान यानं शतक ठोकलं. त्याला अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली साथ दिली.
मुशीर खानची शानदार खेळी : मुंबईनं 42 व्या रणजी चषकाच्या विजयाकडं वाटचाल केलीय. मुंबईनं विदर्भापुढं विजयासाठी 538 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय. रणजी चषकावर जवळपास मुंबईनं नाव कोरल्याचं जमा आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर अजिंक्य रहाणे यानं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. मुशीर आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्येही शतकी भागिदारी झाली.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला : मुशीर खाननं रणजीच्या फायनलमध्ये त्यानं ३२६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीनं १३६ धावांचे योगदान दिले. मुशीरनं रणजी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरनं १९९४-९५ मध्ये अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध दुहेरी शतक झळकावलं होतं.
काय होता सचिन तेंडुलकरचा विक्रम : सचिन तेंडुलकरनं १९९४-९५ च्या मोसमातील अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध दोन शतकं झळकावली होती. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण मुंबईकर ठरला होता. मुशीर खाननं तो विक्रम मोडलाय. मुशीरनं वयाच्या १९ व्या वर्षी हा विक्रम मोडीत काढलाय.
हेही वाचा - IPL 2024 : IPL आधी BCCI ची मोठी घोषणा! ऋषभ पंत इन, तर दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळं आऊट