ETV Bharat / sports

प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वात पुणेरी पलटणनं मारली बाजी; विजयाचं रहस्य सांगत कर्णधार असलम इनामदार म्हणाला... - Aslam Inamdar On PKL victory

Puneri Paltan PKL Victory : प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेचं विजेतेपद पुणेरी पलटणनं जिंकलं. 74 दिवसांच्या अतितटीच्या 12 संघांमध्ये रंगलेल्या सामन्यानंतर हरयाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांनी अंतिम फेरीत एन्ट्री मारली होती. पुण्यानं हरयाणावर 28-25 ने मात दिली. अवघ्या 3 गुणांनी पुण्यानं हरयाणाला पराभूत केलं. पुणेरी पलटणचा कर्णधार असलम इनामदार यानं या विजयामागचं रहस्य सांगितलंय.

Puneri Paltan Captain Aslam Inamdar
पुणेरी पलटण कर्णधार असलम इनामदार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:18 PM IST

पुणेरी पलटण कर्णधार असलम इनामदार मुलाखत

पुणे Puneri Paltan PKL Victory : प्रो कबड्डी लीग 2024 च्या दहाव्या सिझनचे विजेतेपद जिंकल्यावर आज (9 मार्च) पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. तसंच यावेळी भव्य विजयी रॅलीही काढण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुणेरी पलटणचा कर्णधार आणि दहाव्या सिझनचा स्टार प्लेअर असलम इनामदार यानं पुणेरी पलटणच्या विजयाचं रहस्य सांगितलंय.

नेमकं काय म्हणाला असलम इनामदार? : यावेळी बोलत असताना असलम इनामदार म्हणाला की, "आम्ही 4 वर्षांपूर्वी युवा पलटण सुरू केली होती. आमच्या 4 वर्षांच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं. सर्व नवीन खेळाडू असल्यानं फक्त प्रेशर कसा हॅण्डल करायचा हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही केलं. आमचं धोरण खूप सरळ आणि साधं होतं. प्रत्येक सामना आम्ही कोणत्याच दबावाखाली अथवा भीतीखाली खेळलो नाही. प्रत्येक खेळाडूला ज्याची त्याची जबाबदारी माहित होती. त्यामुळंच एक संघ म्हणून आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकलो."

विजयात प्रत्येक खेळाडूचा महत्वाचा वाटा : पुढं तो म्हणाला की, "आमचा संघ प्रत्येक बाबतीत भक्कम होता, आणि हेच आमचं वैशिष्ट्य होतं.आमच्या संघातील जवळजवळ प्रत्येक खेळाडू हा अष्टपैलू होता. तसंच प्रत्येक खेळाडूनं टीमच्या विजयात महत्वाची कामगिरी पार पाडली", असंही त्यानं सांगितलं. तसंच मी 2008 सालापासून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. पण माझ्या करिअरला 2020 पासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. जर मी चुकीच्या पद्धतीनं पुढं गेलो असतो तर ते यश फक्त एक किंवा दोन वर्षासाठीच असतं. त्यामुळं आयुष्यात हार्डवर्क आणि संयम हे खूप गरजेचं असल्याचंही असलम यावेळी म्हणाला.

हेही वाचा -

  1. महिला दिन विशेष : पुरुषी वर्चस्व असणाऱ्या कबड्डी खेळातील प्रो कबड्डी संघाच्या एकमेव महिला मालकीण राधा कपूर
  2. Kabaddi Players Sai Darshan: कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारे आकाश शिंदे आणि असलम इनामदार यांनी घेतले साई दर्शन....
  3. Asian Kabaddi Championship : भारतीय कबड्डी संघाने रचला इतिहास, आठव्यांदा पटकावले आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपचे विजतेपद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.