ETV Bharat / sports

भारताचे 'हे' दिग्गज खेळाडू ज्यांनी क्रिकेटच नव्हे, तर इतर खेळांमध्येही दाखवला जलवा - Two Sports For India

Cricketers Who Played Other Sports : आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी दोन खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या यादीत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचाही समावेश आहे.

Cricketers Who Played Other Sports
Cricketers Who Played Other Sports (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 23, 2024, 1:35 PM IST

नवी दिल्ली Cricketers Who Played Other Sports : क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू झाले आहेत ज्यांनी फलंदाजी आणि गोलं जोरावर स्वत:चं नाव कमावलं आहे. पण क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही हात आजमावला आहे.

चुन्नी गोस्वामी : भारतीय खेळाडू चुन्नी गोस्वामीनं फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते भारताकडून फुटबॉलही खेळला आहे. गोस्वामी यांनी 1962 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 1964 आशिया चषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं आहे. यासोबतच त्यांनी 1960 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी 50 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामनेही खेळले आहेत. फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांनी क्रिकेटमध्ये हात आजमावला आणि बंगालसाठी 46 प्रथम श्रेणी सामने खेळले, जिथं त्यांनी 28.42 च्या सरासरीनं फलंदाजीत 1592 धावा केल्या. त्यांच्या नावावर 1 शतक आणि 7 अर्धशतकांची नोंद आहे.

Cricketers Who Played Other Sports
चुन्नी गोस्वामी (IANS Photo)

कोटा रामास्वामी : भारतीय खेळाडू कोटा रामास्वामी यांनी टेनिस आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1920 मध्ये डेव्हिस कप या प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेत भाग घेतला. यानंतर, 1936 मध्ये, त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पदार्पण करुन इंग्लंडमध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत, त्यांनी 53 सामन्यांमध्ये 28.91 च्या सरासरीनं एकूण 2400 धावा केल्या. यात 2 शतकं आणि 12 अर्धशतकं केली.

अजित आगरकर : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यानं क्रिकेटसोबत गोल्फमध्ये हात आजमावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आगरकरनं गोल्फमध्ये हात आजमावला आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. 2016 मध्ये बेंगळुरु येथील प्रेस्टीज गोल्फशायर इथं झालेल्या BMR वर्ल्ड कॉर्पोरेट गोल्फ चॅलेंजच्या अंतिम फेरीत त्यानं भारताला विजय मिळवून दिला. त्यानं 191 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करताना 288 आणि 26 कसोटीत 58 बळी घेतले आहेत.

Cricketers Who Played Other Sports
अजित आगरकर (IANS Photo)

युझवेंद्र चहल : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलनं क्रिकेट आणि बुद्धिबळ या दोन्हींमध्ये भारतासाठी हात आजमावला आहे. चहलनं भारताच्या वतीनं जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर त्यानं बुद्धिबळ सोडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आता चहल भारताकडून क्रिकेट खेळतो आहे.

Cricketers Who Played Other Sports
युझवेंद्र चहल (IANS Photo)

कपिल देव : भारतीय क्रिकेट संघाचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव देखील अशा खेळाडूंमध्ये आहे, ज्यांनी भारतासाठी दोन सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. कपिल देव यांनी क्रिकेट आणि गोल्फ या दोन्ही खेळांमध्ये भाग घेतला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कपिलनं गोल्फ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कपिल देव हे ऋषी नरेन आणि अमित लुथरा यांच्यासोबत एशिया पॅसिफिक सीनियर 2018 मध्ये भारतासाठी गोल्फ खेळले. मार्च 2021 मध्ये, त्यांना प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) च्या बोर्ड सदस्यांपैकी एक म्हणून समाविष्ट करण्यात आलं.

Cricketers Who Played Other Sports
कपिल देव (IANS Photo)

हेही वाचा :

  1. भारताच्या दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडला झटका, श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये नुकसान - WTC Point Table Update
  2. अफगाणिस्तान क्रिकेट म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव... स्वतःचं मैदान आणि सरकारचा पाठिंबा नसतानाही बलाढ्य संघाविरुद्ध मालिका जिंकत रचला इतिहास - AFG vs SA 3rd ODI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.