हैदराबाद Pakistan Cricket Team : पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट संघात 21 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना रावळपिंडीत तर दुसरा सामना कराचीत होणार आहे. पण आता मोठी बातमी समोर आली आहे की पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना प्रेक्षकांविना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानी भूमीवर आयोजित केली जाणार आहे आणि त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आधीच वेळापत्रक आयसीसीकडं पाठवलं आहे. (Test Match in Empty Stadium)
PCB statement on spectators' attendance in Karachi Test
— PCB Media (@TheRealPCBMedia) August 14, 2024
Details here ⤵️ https://t.co/G5bdFyoh6N
चाहत्यांशिवाय होणार दुसरा कसोटी सामना : कोविड-19 च्या दिवसांची आठवण करुन देत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या बांधकामामुळं हा कठीण निर्णय घेण्यात आल्याचं पीसीबीनं म्हटलं आहे. बोर्डानं एका निवेदनात म्हटलं की, आम्हाला समजतं की आमचे उत्साही प्रेक्षक क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात जे आमच्या खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात. तथापि, आमच्या चाहत्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
काय म्हणालं बोर्ड : "सर्व उपलब्ध पर्यायांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, आम्ही निर्णय घेतला आहे की दुसरी कसोटी रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे," असंही निवेदनात म्हटलं आहे. बोर्डानं सांगितलं की, या निर्णयामुळं 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या तिकिटांची विक्री तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात आली आहे. बोर्डानं म्हटलं की, ज्या चाहत्यांनी आधीच तिकिटं खरेदी केली आहेत त्यांना आपोआप संपूर्ण परतावा मिळेल. जो तिकीट खरेदी करताना दिलेल्या खात्याच्या तपशीलात जमा केला जाईल.
हेही वाचा :