डरबन Patrick Kruger Bowled 11 Ball His First Over : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघानं आपला दबदबा कायम राखत आणखी एका मालिकेत विक्रमी कामगिरी केली आहे. विश्वचषक फायनलनंतर पहिल्यांदाच भिडणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल 29 जून रोजी सारखाच लागला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. विक्रमी शतक झळकावणारा सलामीवीर संजू सॅमसन (107) भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार होता. तर वरुण चक्रवर्ती (3/25) आणि रवी बिश्नोई (3/28) या फिरकी जोडीनं मिळून अर्धा संघ उद्ध्वस्त केला.
Patrick Kruger in his first over:
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 8, 2024
- 1, 4, N1, 2, WD, N, WD, WD, 1, 1, W.
- He picked a Wicket in the 11th ball in his first over. 🤯 pic.twitter.com/M3SjrFHQEO
नेमकं काय झालं : तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज पॅट्रीक क्रुगरनं भारताच्या फलंदाजीदरम्यान एका ओव्हरमध्ये एक किंवा दोन नव्हे तर एकूण 11 चेंडू टाकले. हे थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आफ्रिकन संघासाठी डावातील नववं षटक टाकण्यासाठी आलेल्या क्रुगरनं आपल्या षटकात एकूण 11 चेंडू टाकले. खरं तर, त्याच्या स्पेलच्या पहिल्याच षटकात सहा चेंडूंव्यतिरिक्त, क्रुगरनं तीन वाइड आणि दोन नो बॉल टाकले. त्यामुळं त्याला एकूण 11 चेंडू टाकावे लागले. मात्र, एवढं करुनही त्यानं शेवटच्या चेंडूवर भारतीय कर्णधाराची विकेट मिळवण्यात यश मिळवलं. क्रुगरचा शेवटचा चेंडू नकल बॉल होता. ज्यात सूर्यकुमार यादव त्याच्या जाळ्यात अडकला. याचा परिणाम असा झाला की चेंडू डीप स्क्वेअर लेगवर असलेल्या अँडिले सिमेलेनकडे गेला. जिथे सिमेलननं कोणतीही चूक केली नाही. यासह सूर्याचा डावही संपुष्टात आला.
End of 11 ball over from Patrick Kruger.
— Dinda Academy (@academy_dinda) November 8, 2024
1 4 NB1 2 WD NB WD WD 1 1 W
Surprisingly just 15 runs came of it and the wicket of SKY 🫡 pic.twitter.com/qhtDBC49ol
11 BALL OVER BY PATRICK KRUGER AND DISMISSED ON LAST BALL SURYA KUMAR YADAV. pic.twitter.com/UbOeQF4EWC
— VIKAS YADAV (@VikasYadav66200) November 8, 2024
सूर्यानं केल्या 21 धावा : पहिल्या T20 सामन्यात बाद होण्यापूर्वी संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला एकूण 17 चेंडूंचा सामना करता आला. या काळात त्याच्या बॅटमधून 123.53 च्या स्ट्राइक रेटनं 21 धावा आल्या. या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीत कर्णधार सूर्यानं दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. या विजयासह भारतानं T20I क्रिकेटमध्ये सलग 11वा विजय नोंदवला. 107 धावांच्या तुफानी खेळीसाठी संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. संजूनं 50 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं 107 धावांची खेळी केली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) November 8, 2024
हेही वाचा :