दांबुला 6 Fours in An Over : श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या t-20 मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात यजमान श्रीलंकेनं वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिकेत बरोबरी साधली आहे. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज पाथुम निसांकानं शमर जोसेफविरुद्ध एका षटकात सलग 6 चौकार मारले. क्रिकेट विश्वात यापूर्वीही असं घडलं आहे, मग निशांकानं वेगळं कसं केलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल.
मालिका 1-1 नं बरोबरीत : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना 15 ऑक्टोबर रोजी दांबुला इथं खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून श्रीलंकेनं पहिल्या T20 सामन्यात झालेल्या पराभवाची बरोबरी केली. श्रीलंकेनं दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव केला, यासह 3 सामन्यांची T20 मालिका आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे. दुसऱ्या T20 मध्ये श्रीलंकेनं विजय मिळवला. पण त्यांचा फलंदाज पथुम निसांकानं वेस्ट इंडिजचा गोलंदाज शामर जोसेफला काय केलं याची सर्वत्र चर्चा होत आहे. निसांकानं जोसेफच्या एका षटकात 6 चौकार मारले.
A comprehensive win for Sri Lanka makes it 1-1 in the T20I series against the West Indies 👊
— ICC (@ICC) October 15, 2024
📝 Scorecard: https://t.co/CCrzExrXTf pic.twitter.com/R85JqbKTUj
पथुम निसांकानं एका षटकात मारले 6 चौकार :
श्रीलंकेच्या डावाच्या चौथ्या षटकात, दुसऱ्या T20I मध्ये शमर जोसेफविरुद्ध पथुम निसांकानं एकाच षटकात 6 चौकार मारले. या षटकात पाथुम निसांकानं शमर जोसेफविरुद्ध सलग 6 चौकार मारुन 25 धावा केल्या. यामध्ये एका वाइडचाही समावेश आहे. शमर जोसेफचा तिसरा चेंडू वाईड झाला. कॅरेबियन गोलंदाजाविरुद्ध श्रीलंकेच्या फलंदाजानं कहर केल्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज : याआधी एका षटकात 6 चौकार मारले आहेत, मग पथुम निसांका आधीच्या सर्व फलंदाजांपेक्षा वेगळा कसा होता? एकाच षटकात सहा चौकार मारणं वेगळं का होते? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे T20 आंतरराष्ट्रीय सामना. अर्थात, एका षटकात 6 चौकार मारणारा पथुम निसांका हा तिलकरत्ने दिलशाननंतरचा जगातील 7वा आणि श्रीलंकेचा दुसरा फलंदाज आहे. पण, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
6 Fours in the Over form Pathum Nissanka. pic.twitter.com/LOkXdfb4ZL
— CricketGully (@thecricketgully) October 15, 2024
आतापर्यंत सहा फलंदाजांनी केला कारनामा :
पथुम निसांकाच्या आधी एका षटकात 6 चौकार मारणारे 6 फलंदाज म्हणजे संदीप पाटील (कसोटी), ख्रिस गेल (कसोटी), अजिंक्य रहाणे (आयपीएल), तिलकरत्ने दिलशान (ओडीआय), रामनरेश सरवन (कसोटी) आणि पृथ्वी शॉ (आयपीएल) समाविष्ट आहेत.
निसांका श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार:
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20I मध्ये पथुम निसांकाच्या एकूण कामगिरीचा संबंध आहे, त्यानं 49 चेंडूत 54 धावा केल्या, जे त्याच्या T20 कारकिर्दीतील 12वं अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान निसांकानं कुसल मेंडिससह T20I मध्ये 1000 धावांची सलामीची भागीदारी पूर्ण केली आणि असं करणारी ती पहिली श्रीलंकेची जोडी ठरली. पथुम निसांकाच्या अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने सामन्यात प्रथम खेळताना 20 षटकांत 6 गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 89 धावांवरच मर्यादित राहिला. श्रीलंकेच्या विजयात निसांकाला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं.
हेही वाचा :
न्यूझीलंड कसोटी जिंकत इतिहास रचणार की भारतीय संघ वर्चस्व कायम ठेवणार? पहिला सामना 'इथं' पाहा लाईव्ह