मेलबर्न Pat Cummins Creates New World Record : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात असलेला बॉक्सिंग-डे कसोटी सामना सध्या अतिशय रोमांचक स्थितीत आहे, ज्यात यजमान ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य दिलं आहे. या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं रोहित शर्माची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहित शर्मानं सलग दुसऱ्यांदा विकेट गमावली. कमिन्सनं रोहितला केवळ 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
Rohit Sharma dismissed for 9 in 40 balls.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2024
KL Rahul dismissed for a 5 ball duck.
PAT CUMMINS MAKING THINGS HAPPEN AT THE MCG. pic.twitter.com/ZeUTmjVwk9
पॅट कमिन्सनं कर्णधार म्हणून कसोटीत केला नवा विक्रम : कसोटी क्रिकेटमध्ये असं क्वचितच घडतं, जेव्हा एका संघाच्या कर्णधारानं त्यांच्या विरोधी संघाच्या कर्णधाराची विकेट घेतली, परंतु जेव्हा बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पॅट कमिन्सनं रोहित शर्माची विकेट घेतली, यासह त्यानं कर्णधार म्हणून सहाव्यांदा रोहित शर्माची विकेट घेतली आहे, ज्यामध्ये रोहितनं त्यावेळी भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. हा देखील कसोटी क्रिकेटमधला एक नवीन विश्वविक्रम आहे कारण याआधी रिची बेनोडनं टेड डेक्सटरला 5 वेळा आपला बळी बनवला होता ज्यात दोघंही आपापल्या संघाचे कर्णधार होते.
A double-wicket maiden for Pat Cummins has shaken up the first session on Day Five. #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघाच्या कर्णधाराला बाद करणारे कर्णधार :
- रोहित शर्मा - पॅट कमिन्सविरुद्ध 6 वेळा बाद
- टेड डेक्सटर - रिची बेनोड विरुद्ध 5 वेळा बाद
- सुनील गावस्कर - इम्रान खानविरुद्ध 5 वेळा बाद
- गुलाबबाई रामचंद - रिची बेनोद विरुद्ध 4 वेळा बाद
- क्लाइव्ह लॉईड - कपिल देव विरुद्ध 4 वेळा बाद
- पीटर मे - रिची बेनोड विरुद्ध 4 वेळा बाद
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा कर्णधार : पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनला आहे ज्यामध्ये त्यानं आतापर्यंत 79 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार इम्रान खानचं नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्यानं कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 88 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिची बेनोडचं नाव आहे ज्यानं 76 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :