पॅरिस Paris Paralympics 2024 : भारताचा स्टार डिस्कस थ्रोअर योगेश कथुनियाने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. योगेशने पुरुषांच्या डिस्कस थ्रो एफ56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. पॅरालिम्पिकमधील हे देशाचे 8 वे पदक आहे, तर हे तिसरे रौप्य पदक आहे. योगेशनं सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे. याआधी योगेशनं टोकियो पॅरालिम्पिकमध्येही रौप्यपदक जिंकलं होतं.
Yogesh won the 8th Medal for Team India 🇮🇳♥️ pic.twitter.com/vARPJIFARs
— The Khel India (@TheKhelIndia) September 2, 2024
ब्राझीलच्या खेळाडूला मिळालं सुवर्णपदक : 27 वर्षीय योगेशनं पहिल्याच प्रयत्नात 42.22 मीटर थ्रो केला, जो त्याचा सर्वोत्तम प्रयत्न होता. या स्पर्धेत ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँटोस क्लाउडनीनं सुवर्णपदक जिंकलं. बतिस्तानं 46.86 च्या सर्वोत्तम थ्रोसह ही कामगिरी केली. बॅटिस्टाचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील या स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दुसरीकडे, ग्रीसच्या त्झोनिस कॉन्स्टँटिनोसने 41.32 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकलं.
योगेश कथुनियाची कामगिरी :
- पहिला थ्रो : 42.22 मीटर
- दुसरा थ्रो : 41.50 मीटर
- तिसरा थ्रो : 41.55 मीटर
- चौथा थ्रो : 40.33 मीटर
- पाचवा थ्रो : 40.89 मीटर
- सहावा थ्रो : 39.68 मीटर
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते :
- अवनी लेखरा (नेमबाजी) : सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) : रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) : कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
- निषाद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
- योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) : रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
हेही वाचा :