पॅरिस Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर (बुधवार) रोजी भारतीय खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत. आता मराठमोळा भारतीय पॅराथलीट सचिन सर्जेराव खिलारीनं दमदार कामगिरी केली आहे. सचिननं पुरुषांच्या शॉट पुटमध्ये (F46) रौप्यपदक जिंकलं आहे. सध्याच्या पॅरालिम्पिकमधील भारताचं हे 21 वं पदक होतं. भारतानं आतापर्यंत 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 11 कांस्यपदकं जिंकली आहेत.
🇮🇳🥈 𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗠𝗢𝗠𝗘𝗡𝗧! Sachin Khilari strikes silver in the Men’s Shot Put - F46 event at the Paris Paralympics 2024, claiming India's 21st medal!
— The Bharat Army (@thebharatarmy) September 4, 2024
🔥 With an incredible throw of 16.32 meters, he becomes the first Indian male shot putter in 30 years to win a Paralympic… pic.twitter.com/GiSh3RzDl4
सचिन खिलारीची अंतिम फेरीतील कामगिरी :
- पहिला थ्रो : 14.72 मीटर
- दुसरा थ्रो : 16.32 मीटर
- तिसरा थ्रो : 16.15 मीटर
- चौथा थ्रो : 16.31 मीटर
- पाचवा थ्रो : 16.03 मीटर
- सहावा थ्रो : 15.95 मीटर
सांगलीचा आहे सचिन : 34 वर्षीय सचिन खिलारी हा सांगली जिल्ह्यातील आहे. वयाच्या नऊव्या वर्षी तो एका सायकल अपघातात जखमी झाला. ज्यामुळं त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं, असं असूनही त्यानं अभियांत्रिकीच्या अभ्यासासोबतच खेळाची आवड जोपासली. सुरुवातीला त्यानं भाला फेकण्यास सुरुवात केली. परंतु, खांद्याच्या दुखापतीनंतर त्यानं शॉटपुटचा पर्याय निवडला. हा बदल त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी : पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारतानं 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदकं जिंकली. एकूण 19 पदकांसह, पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहेत, ज्यांच्या जीवनावर 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते :
- अवनी लेखरा (नेमबाजी) : सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) : कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) : रौप्यपदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) : कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
- निषाद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष उंच उडी (T47)
- योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
- नितेश कुमार (बॅडमिंटन) : सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
- मनीषा रामदास (बॅडमिंटन) : कांस्यपदक, महिला एकेरी (SU5)
- तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) : रौप्यपदक, महिला एकेरी (SU5)
- सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) : रौप्यपदक, पुरुष एकेरी (SL4)
- शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) : कांस्यपदक, मिश्र कंपाउंड ओपन
- सुमित अँटील (ॲथलेटिक्स) : सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
- नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) : कांस्यपदक, महिला एकेरी (SH6)
- दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
- मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, पुरुष उंच उडी (T63)
- शरद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष उंच उडी (T63)
- अजित सिंग (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
- सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) : कांस्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
- सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष शॉटपुट (F46)
हेही वाचा :