पॅरिस Paris Olynmpics 2024 Boxing : भारताची अव्वल बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेननं बुधवारी इथं सुरु असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिलांच्या 75 किलो वजन गटातील राऊंड ऑफ 16 सामन्यात नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टेडवर दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. या सामन्यात लोव्हलिनानं चांगली कामगिरी करत 5-0 असा विजय मिळवला. या विजयासह लोव्हलिना आता पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.
कसा झाला सामना : या सामन्यात लोव्हलिनानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर सातत्यानं आक्रमण केलं. आपल्या उत्कृष्ट पंचांनी तिनं सर्व न्यायाधीशांना त्याला पूर्ण गुण देण्यास भाग पाडलं. या सामन्यात नॉर्वेच्या हाफस्टेडला तिनं वर्चस्व गाजवण्याची संधीच दिली नाही. या सामन्यात, लोव्हलिना बोरगोहेनला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 5 न्यायाधीशांकडून परिपूर्ण 10 गुण मिळाले, तिसऱ्या फेरीत लोव्हलिनाला तीन न्यायाधीशांकडून 9 आणि 2 न्यायाधीशांकडून 10 गुण मिळाले. सामन्याच्या शेवटी तिचा स्कोर 29, 30, 29,30, 29 असा होता. तिनं हा सामना 5-0 असा एकतर्फा जिंकला.
लोव्हलिनाला पाचही न्यायाधीशांकडून उत्कृष्ट गुण : नेदरलँडच्या सॅम ड्युनार यांनी लोव्हलिना बोर्गोहेनला पूर्ण 30 गुण दिले आणि हंगेरीच्या न्यायाधीश वेरोनिका यांनीही पूर्ण 30 गुण दिले. याशिवाय अर्जेंटिनाचा रॉबर्टो फर्नांडो सेवा आणि कझाकस्तानचा येर्मेक सुयेनिश आणि इराणचा न्यायाधीश हाघिघी सबेत बाबक बोर्डबार यांनी 22-29 गुण दिले. आता भारताच्या स्टार बॉक्सरकडे पुढील फेरीत आपली उत्कृष्ट कामगिरी करुन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याची अपेक्षा असेल.
प्रीती पवारचं आव्हान संपुष्टात : यापुर्वी मंगळवारी कॅनडाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय बॉक्सर प्रीती पवारचं पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ 16 च्या फेरीत तिला कोलंबियाची बॉक्सर येनी मार्सेला एरियास कास्टानेडा हिनं पराभूत केलं.
हेही वाचा :