पॅरिस 6 August India Olympics Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा दहावा दिवस भारतासाठी निराशाजनक होता, भारताला सोमवारी 2 पदकं जिंकण्याची संधी होती. परंतु, बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन तसंच अनंतजित सिंग नारुका आणि महेश्वरी चौहान स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत झाले. आता अकराव्या दिवशी सर्वांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे असतील, ज्यांना उपांत्य फेरीत विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश मिळवून सुवर्णपदक मिळवायचं आहे.
टेबल टेनिस : पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या अकराव्या दिवशी, भारतीय पुरुष खेळाडू टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. यात मानव ठक्कर, शरत कमल आणि हरमीत देसाई दिसणार आहेत. पुरुष सांघिक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 च्या फेरीत भारतीय संघाचा चीन संघाशी सामना होणार आहे.
- पुरुष सांघिक राऊंड ऑफ 16 - (मानव ठक्कर, शरथ कमल आणि हरमीत देसाई) - दुपारी 1:30 वाजता
ॲथलेटिक्स : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेच्या अकराव्या दिवशी दिसेल, तो भालाफेक स्पर्धेच्या पात्रता सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्याच्याशिवाय याच स्पर्धेत भारताचा किशोर कुमार जैना दिसणार आहे.
- पुरुष भालाफेक पात्रता (नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जैना) - दुपारी 1:50 वाजता
ॲथलेटिक्स : भारताची किरण पहल महिलांच्या 400 मीटर स्टीपलचेस फेरीत दिसणार आहे. ती भारतासाठी पदकाचा दावा करताना दिसणार आहे.
- महिलांची 400 मीटर स्टीपलचेस फेरी - दुपारी 2:20 वाजता
कुस्ती : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अकराव्या दिवशी ॲक्शनमध्ये दिसणार आहे. विनेश महिलांच्या 50 किलो गटात स्पर्धा करेल. पात्रता ते उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यांमध्ये ती सहभागी होणार आहे. याशिवाय 68 किलो गटातही रिपेचेज आणि पदकांचे सामने खेळवले जाणार आहेत. भारताची निशा दहिया या प्रकारात खेळत आहे. ती सध्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे, जर तिनं फायनलमध्ये प्रवेश केला तर आज अकराव्या दिवशी ती पदकासाठी खेळू शकते.
- महिला 50 किलो (विनेश फोगट) - दुपारी 2:30 वाजता
- महिला 68 किलो पदक सामना - मध्यरात्री 12:20 वाजता
- महिला 68 किलो रिपेचेज - दुपारी 2:30 वाजता
हॉकी : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ जर्मनीसोबत उपांत्य फेरीत खेळणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरी गाठून सुवर्णपदक जिंकण्याचं या संघाचं लक्ष्य असेल.
- पुरुष हॉकी उपांत्य फेरी (भारत विरुद्ध जर्मनी) - रात्री 10:30 वाजता
हेही वाचा :