पॅरिस 4 August India Olympics Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आठवा दिवस भारतासाठी निराशाजनक होता आणि देशाच्या आणखी एक पदक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. कारण भारतीय नेमबाज मनू भाकेरचं महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक हुकलं. पण आज नवव्या दिवशी भारताला पदक निश्चित करण्यासाठी एक पाऊल पुढं जाण्याची संधी असेल.
A day to remember for India's #Hockey🏑 fraternity❤️
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
For the very first time in 5 decades, the #MenInBlue🔵 registered a victory against Australia at the #Olympics.
Harmanpreet Singh's brace and Abhishek's goal made all the difference as the Aussies were beaten by 3-2🫶😎… pic.twitter.com/NJJOR6XhoM
नेमबाजी : भारतासाठी नेमबाजीत, 25 मीटर रॅपिड फायर मेन्स क्वालिफायर स्टेज 1 खेळला जाईल. यामध्ये भारतासाठी विजयवीर सिद्धू आणि अनिश बनवाला दिसणार आहेत. यानंतर स्कीट महिला पात्रतेच्या दुसऱ्या दिवशी रायजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान दिसणार आहेत.
- 25 मीटर रॅपिड फायर पुरुष पात्रता टप्पा 1 (विजयवीर सिद्धू आणि नीश बनवाला) - दुपारी 12:30 वाजता
- स्कीट महिला पात्रता दिवस 2 (रयजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान) - दुपारी 1 वाजता
Lakshya on 🧘🏻♂️ 𝐒𝐞𝐧 𝐌𝐨𝐝𝐞
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
The star shuttler, who is playing his debut #Olympics, has become the 1⃣st Indian male shuttler🏸 to have qualified for the Men's Singles Semi-finals.
Lakshya is surely having a memorable run at the #ParisOlympics2024💯😎
Let's get behind him as… pic.twitter.com/8RaW8itkae
हॉकी : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या नवव्या दिवशी भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनशी भिडणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठून पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढं टाकण्याची संधी असेल. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी 3 सामने जिंकले, 1 सामना अनिर्णित राहिला आणि 1 सामना गमावला. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर अर्जेंटिनाशी बरोबरी साधली आणि बेल्जियमनं पराभूत केलं. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे.
- पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी (भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन) - दुपारी 01:30 वाजता
ऍथलेटिक्स : भारतासाठी ऍथलेटिक्समध्ये, पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस फेरी 1 मध्ये आपला दावा सादर करताना दिसेल, तर जेसविन ऑल्ड्रिन पुरुषांच्या लांब उडी पात्रतेमध्ये दिसेल. भारतीय चाहत्यांना या दोघांकडून ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.
- महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस फेरी 1 (पारुल चौधरी) - दुपारी 1:35 वाजता
- पुरुषांची लांब उडी पात्रता - दुपारी 2:30 वाजता
बॉक्सिंग : भारतासाठी बॉक्सिंगमध्ये एक मोठा सामना होणार आहे. महिलांच्या 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लोव्हलिना बोरगोहेनाचा सामना चीनच्या ली कुएनशी होणार आहे. लोव्हलिनाने महिलांच्या 75 किलो वजनी गटातील फेरीच्या 16 सामन्यात नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टेडचा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. आता उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची जबाबदारी तिच्यावर असेल. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्यपदक जिंकलं आहे.
- महिला 57 किलो उपांत्यपूर्व फेरी - (लोव्हलिना बोरगोहेन) - दुपारी 3:02 वाजता
बॅडमिंटन : भारताच्या नवव्या दिवसाची सुरुवात बॅडमिंटननं होणार आहे. जिथं भारताचा लक्ष्य सेन हा उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनसोबत खेळताना दिसणार आहे. 22 वर्षीय लक्ष्य, ज्याची जागतिक रँक सध्या 22 आहे, आता उपांत्य फेरीत जागतिक रँक 2 व्हिक्टरशी सामना करताना दिसेल. तत्पूर्वी, त्यानं उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा रोमहर्षक लढतीत पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
- पुरुष एकेरी उपांत्य फेरी (लक्ष्य सेन) - दुपारी 03:30 वाजता
सेलिंग : आज ऑलिम्पिकच्या नवव्या दिवशी, ॲथलीट विष्णू सरवणन पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेत भारतासाठी दिसणार आहे. यासोबतच नेत्रा कुमनन महिलांच्या नौकानयन स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवणार आहे. हे दोघंही नवव्या दिवशी रेस 7 आणि रेस 8 मध्ये सहभागी होतील.
- पुरुषांची सेलिंग शर्यत 5 आणि शर्यत 6 (विष्णू सरवणन) - दुपारी 3:35 वाजता
- महिला सेलिंग शर्यत 5 आणि शर्यत 6 (नेत्रा कुमनन) - संध्याकाळी 6:05 वाजता
हेही वाचा :