नवी दिल्ली 28 July India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र होता. आज म्हणजेच 28 जुलै (रविवार) भारतीय खेळाडूंना दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली प्रतिभा दाखवायची आहे. आज, भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजी या खेळांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करताना दिसतील.
Each #Olympics has been different for @Pvsindhu1. 💪🏸#Paris2024 #Badminton pic.twitter.com/SkpRCMvMWS
— BWF (@bwfmedia) July 27, 2024
28 जुलै रोजी भारतीय खेळाडूंचे सामने :
रोइंग - बलराज पनवार भारतासाठी रोइंग स्पर्धेत दिसणार आहे. रोइंगमध्ये चौथं स्थान मिळवून त्यानं रिपेचेजमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. बलराजनं 7:07.11 मिनिटं वेळ घेत चौथा क्रमांक पटकावला. आता तो कांस्यपदकासाठी आपली दावेदारी करताना दिसणार आहे.
- पुरुष एकेरी स्कल्स रिपेचेज फेरी (बलराज पनवार - भारत) - दुपारी 12:30 वाजता
नेमबाजी - वालारिवान इलावेनिल आणि रमिता रमिता भारतासाठी 10 मीटर एअर रायफल शूटिंग महिला पात्रता सामन्यांमध्ये सहभागी होतील. यानंतर संदीप सिंग आणि अर्जुन बबुता पुरुषांच्या पात्रता 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत दिसणार आहेत. हे दोघांकडूनही भारताला पदकाची आशा आहे. यानंतर अंतिम सामने होतील. ज्यांची वेळ वेगळी आहे.
- 10 मीटर एअर रायफल (महिला पात्रता) - दुपारी 12:45 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल (पुरुष पात्रता) - दुपारी 1 वाजता
- 10 मीटर एअर रायफल (पुरुष अंतिम) - दुपारी 02:45 वाजता
- 10 मीटर एअर पिस्तूल (महिला अंतिम) - दुपारी 3:30 वाजता
बॅडमिंटन - पॅरिस ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी बॅडमिंटनमध्ये ॲक्शन पॅक्ड दिवस असणार आहे. महिला एकेरीत पीव्ही सिंधू जर्मनीच्या रोथ फॅबियनसोबत खेळताना दिसणार आहे. तर एचएस प्रणॉय पुरुष एकेरीत दिसणार आहे.
- महिला एकेरी - पीव्ही सिंधू : दुपारी 12 वाजता
- पुरुष एकेरी - एच.एस. प्रणॉय : रात्री 8.30 वाजता
टेबल टेनिस - भारतासाठी टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत अकुला श्रीजा स्वीडनच्या कलबर्ग क्रिस्टिनासोबत खेळताना दिसणार आहे. भारताची मनिका बंत्रा महिलांच्या 64व्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या हर्सी अण्णासोबत खेळताना दिसणार आहे. पुरुष एकेरीत अचंता शरथ कमल स्लोव्हेनियाच्या कोझुल डेनीशी सामना खेळणार आहे.
- टेबल टेनिस - महिलांची 64 फेरी - दुपारी 02:15 वाजता
- टेबल टेनिस - पुरुषांची 64 फेरी - दुपारी 3 वाजता
- टेबल टेनिस - महिला 64 फेरी - दुपारी 4:30 वाजता
The first round of #Boxing matches have been released for our 🇮🇳 boxers! 🥊
— SAI Media (@Media_SAI) July 26, 2024
Let’s get ready to enjoy the action packed moments at #ParisOlympics2024 ✅#Paris2024
Let's support the boxers and #Cheer4Bharat. #OlympicsOnJioCinema pic.twitter.com/72aR2rP7ln
बॉक्सिंग - भारतीय कुस्तीपटू निखत झरीन महिलांच्या 50 किलो गटाच्या 32व्या फेरीत जर्मनीच्या क्लोत्झर मॅक्सी कॅरिनासोबत खेळताना दिसणार आहे.
- महिला 50 किलो - दुपारी 3:50 वाजता
तिरंदाजी - दीपिका कुमारीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिरंदाजीमधील महिला सांघिक स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताकडून अंकिता भक्त, भजन कौर आणि दीपिका कुमारी मैदानात उतरणार आहेत.
- महिला संघ - तिरंदाजी - संध्याकाळी 5.45 वाजता
पोहणे - पुरुषांमध्ये श्रीहिर नटराज आणि महिलांमध्ये धनिधी देशिंगू हे भारतासाठी पोहताना दिसणार आहेत.
- पुरुषांची 100 मीटर बॅकस्ट्रोक (हीट 2) : श्रीहरी नटराज - दुपारी 3.16 वाजता
- महिलांची 200 मी फ्रीस्टाइल (हीट 1) : धिनिधी देसिंघू - दुपारी 3.30 वाजता
हेही वाचा :