पॅरिस 1 August India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा पाचवा दिवस भारतासाठी चांगला होता. भारतानं बुधवारी एकही पदक सामना खेळला नाही. परंतु, भारतीय शटलर्स पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापले सामने जिंकत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. याशिवाय टेबल टेनिसमध्येही श्रीजा अकुलानं चमकदार कामगिरी केली. आज आम्ही तुम्हाला सहाव्या दिवसाच्या पूर्ण वेळापत्रकाबद्दल सांगणार आहोत.
भारतीय खेळाडूंच्या 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धा :
गोल्फ : भारतीय खेळाडू 1 ऑगस्ट रोजी गोल्फमध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसतील. गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा पुरुषांच्या वैयक्तिक खेळाच्या फेरी-1 च्या सामन्यात दिसणार आहेत.
- पुरुषांच्या वैयक्तिक खेळाची फेरी-1 (गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा) - दुपारी 12:30 वाजता
नेमबाजी : आज नेमबाजीत भारताला पदक मिळण्याची आशा असेल. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत कोल्हापुरचा स्वप्नील कुसाळे भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. याशिवाय महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता स्पर्धेत सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मुदगिल खेळताना दिसतील.
- पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स फायनल (स्वप्नील कुसळे) - दुपारी 1 वाजता
- महिलांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पात्रता (सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मुदगिल) - दुपारी 3:30 वाजता
हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या गट सामन्यात बेल्जियमसोबत खेळताना दिसणार आहे. भारतानं न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे, तर अर्जेंटिनासोबत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता त्यांना बेल्जियमचा पराभव करण्याची संधी असेल.
- भारत वि बेल्जियम - दुपारी 1:30 वाजता
बॉक्सिंग : निखत जरीन राऊंड ऑफ 16 च्या महिलांच्या 50 किलो गटात भारतासाठी रिपब्लिक ऑफ चीनच्या वू यू विरुद्ध खेळताना दिसणार आहे.
- महिलांची 50 किलो 16 फेरी (निकाहत जरीन) - दुपारी 2:30 वाजता
तिरंदाजी : तिरंदाजीच्या पुरुषांच्या वैयक्तिक एलिमिनेशन फेरीत प्रवीण रमेश जाधव चीनच्या केए वेन्चाओसह भारतासाठी खेळताना दिसणार आहे.
- पुरुषांची वैयक्तिक एलिमिनेशन फेरी - दुपारी 2:30 वाजता
नौकानयन : ॲथलीट विष्णू सरवणन भारतासाठी पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेत दिसणार आहे. तर नेत्रा कुमनन भारतासाठी महिला नौकानयन स्पर्धेत दिसणार आहे.
- पुरुष नौकानयन (विष्णू सरवनन) - दुपारी 3:30 वाजता
- महिला नौकानयन (नेत्रा कुमनन)-संध्याकाळी 7 वाजता
हेही वाचा :