Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार पॅडलर हरमीत देसाईला फ्रान्सविरुद्ध पुरुष एकेरीच्या लढतीत फेलिक्स लेब्रुनकडून पराभव स्वीकारावा लागला. फ्रान्सच्या लेब्रुननं हरमीतचा 28 मिनिटांत 4-0 असा पराभव केला. या पराभवासह त्याचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपलाय.
कसा गमावला सामना : हरमीत देसाईला सुरुवातीपासूनच लेब्रुनविरुद्ध खेळण्यासाठी लय सापडली नाही. त्याला एकही सेट जिंकता आला नाही. त्याला पहिल्या सेटमध्ये 11-8 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्यानं सुरुवातीला वेग घेतला. पण तिथंही त्याला 11-8 असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सेटमध्ये हरमीतला लय मिळेल अशी अपेक्षा होती, पण यावेळी त्याचा दुसऱ्या सेटपेक्षा जास्त गुणांनी पराभव झाला. या सेटमध्ये त्याला 11-7 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये त्याला पुन्हा 11-8 नं पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकसाठी हरमीतची आशा संपुष्टात आली.
Result Update: Men's #TableTennis🏓Round of 32👇
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2024
Tough luck today for our paddler @HarmeetDesai who bows out of #ParisOlympics2024.
In what was his second match of the tournament after winning the preliminary round, Harmeet loses to Frenchman 🇫🇷 Felix Lebrun 0-4 pic.twitter.com/2ZuYMvHZ23
लेब्रुनचा शानदार विजय : लेब्रुनला चारही सेटमध्ये जिंकण्यासाठी केवळ 28 मिनिटे लागली. टेबल टेनिसमध्ये दुसऱ्या दिवशी भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्याआधी टेबल टेनिस पुरुष एकेरीत शरथ कमलला 4-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता हरमीत देसाईच्या पराभवामुळे टेबल टेनिस पुरुष एकेरीत भारताची मोहीम संपुष्टात आली आहे. याआधी हरमीतनं शनिवारी पहिल्या फेरीत जॉर्डनच्या अबू झैद अबो यामनचा 4-0 असा पराभव केला होता. मात्र, फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात तशी चमकदार कामगिरी दिसली नाही.
Table Tennis: Harmeet Desai (WR 86) loses to home favorite & WR 5 Felix Lebrun 0-4 in R64. #TableTennis #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/pwyzzhCvB8
— India_AllSports (@India_AllSports) July 28, 2024
- याआधी हरमीतने शनिवारी पहिल्या फेरीत जॉर्डनच्या अबू झैद अबो यामनचा 4-0 असा पराभव केला होता. मात्र, त्याला फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात समाधानकारक खेळता आले नाही. 2018 आणि 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक विजेत्या संघात हरमीतचा समावेश होता.
हेही वाचा
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज तिसऱ्या दिवशीही नेमबाजीत भारताला मिळणार पदक? - Paris Olympics 2024
- टोकियोत पिस्तूल तुटलं, डोळ्याच्या दुखापतीमुळं बॉक्सिंग सुटलं; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर आता 'पॅरिस जिंकलं' - Paris Olympics 2024
- भारतीय महिला तिरंदाजी संघाची खराब कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडकडून पराभूत - Paris Olympics 2024
- टेबल टेनिसमध्ये भारतासाठी 'कही खुशी कही गम'; स्टार पॅडलर शरथ कमलचं आव्हान संपुष्टात तर श्रीजा अकुला उपउपांत्यपूर्व फेरीत - Paris Olympics 2024