नवी दिल्ली Manu Bhaker Sarbajot singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज दुसरं पदक जिंकलं आहे. भारताची स्टार नेमबाज जोडी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकवून भारताचा तिरंगा फडकवला आहे. यानिमित्ताने देशातील अनेक लोक सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळं देशातील अनेक दिग्गजांनी त्यांचं अभिनंदन केलंय.
Our shooters continue to make us proud!
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
Congratulations to @realmanubhaker and Sarabjot Singh for winning the Bronze medal in the 10m Air Pistol Mixed Team event at the #Olympics. Both of them have shown great skills and teamwork. India is incredibly delighted.
For Manu, this… pic.twitter.com/loUsQjnLbN
पीएम मोदींची प्रतिक्रिया : भारताच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांंचं अभिनंदन केलं आहे. पीएम मोदींनी सोशल मिडिया एक्सवर लिहिलं की, "आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं अभिनंदन. दोघांनी उत्तम कौशल्य दाखवंल. मनू भाकरचं हे सलग दुसरं ऑलिम्पिक पदक आहे."
Congratulations to Manu Bhaker and Sarabjot Singh for winning bronze medal for India in the mixed team 10 metre air pistol event for shooting!
— President of India (@rashtrapatibhvn) July 30, 2024
Manu Bhaker has created history, becoming the first woman shooter from India to win two medals in the same Olympic games. She has done us…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा : सोशल मीडिया सोशल मिडिया एक्सवर लिहिलं की, "मनू भाकरनं इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारतातील पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तिचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. मी मनू भाकरला आणि सरबज्योत सिंगला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा."
Manu & Sarabjot: You've done what no Indian shooting pair has done before. India's first Olympic shooting team medal. Savour this moment, you've earned it! Proud 👏 🇮🇳 #Olympics2024 #Paris2024 #Shooting #ManuBhaker #SarabjotSingh
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) July 30, 2024
सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानं केलं कौतुक : ऑलिम्पिकमधील भारताचा माजी सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानेही या दोघांचं पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यानं लिहिलं, "मनू आणि सरबजोत तुम्ही ते केलं ते यापूर्वी कोणत्याही भारतीय शूटिंग जोडीनं केलं नाही. हे भारताचं पहिलं ऑलिम्पिक नेमबाजी सांघिक पदक आहे."
Huge congratulations to @realmanubhaker and Sarabjot Singh for winning the historic BRONZE medal in the 10m Air Pistol Mixed Team event for Bharat!
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 30, 2024
Your incredible teamwork has made the nation proud.#ParisOlympics2024#Cheer4Bharat pic.twitter.com/HM93vwj0K2
क्रीडामंत्र्यांकडून कौतुक : भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लिहिलं की, "10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं खूप खूप अभिनंदन!"
#WATCH फ़रीदाबाद (हरियाणा): भारतीय निशानेबाज मनु भाकर के कांस्य पदक जीतने पर उसके पिता राम किशन भाकर ने कहा, " ये बहुत बड़ी खुशखबरी है इसके लिए मैं देशवासियों का धन्यवाद करता हूं कि उन्होंने इतना प्यार और आर्शीवाद दिया और मनु की मदद की।....हम उम्मीद करते हैं कि आगे वो अच्छा… pic.twitter.com/mAbhE5VPVI
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2024
मनू भाकरच्या वडीलांची प्रतिक्रिया : मनू भाकरचे वडील राम किशन भाकर म्हणाले, "मनू भाकर-सरबजोत सिंग जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. भविष्यात ती आणखी चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे."
#WATCH | Ambala, Haryana: At #ParisOlympics2024, shooters Manu Bhaker and Sarabjot Singh bring India its second medal as they win Bronze in 10m Air Pistol Mixed team event.
— ANI (@ANI) July 30, 2024
Sarabjot Singh's father, Jitender Singh says, " ...manu bhaker and my son have won bronze. heartiest… pic.twitter.com/kQgKLbS1GS
सरबज्योत सिंगच्या वडीलांची प्रतिक्रिया : सरबज्योत सिंगचे वडील जितेंद्र सिंग यांनी आनंद व्यक्त करताना सांगितलं की, "मनू भाकर आणि माझ्या मुलानं देशासाठी कांस्यपदक जिंकलं आहे. मनु भाकर आणि त्यांच्या परिवाराच हार्दिक अभिनंदन."
हेही वाचा
- नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनं रचला इतिहास; भारताला जिंकवून दिलं दुसरं पदक - Paris Olympics 2024
- मनिका बत्राचं लक्षणीय यश; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला - Paris Olympics 2024
- शेतमजुराच्या मुलाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हुलकावणी; उपांत्यपूर्व सामन्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रवीणची संघर्षमय कहाणी - PARIS OLYMPIC 2024
- भारतीय तिरंदाजांचे 'तीर' भरकटले; उपांत्यपूर्व सामन्यात तुर्कीकडून पराभव - Paris Olympics 2024